मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्ती कामांसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येईल.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद /अर्ध-जलद लोकल सेवा ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील. या लोकल सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद/अर्ध-जलद लोकल सेवा कल्याण ते ठाणे दरम्यान अप धीम्या मार्गावरून वळविण्यात येतील. या सेवा त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा व कळवा स्थानकांवर थांबतील व पुढे मुलुंड स्थानकात अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील. या लोकल सेवा सुमारे १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल-एक्सप्रेस ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या मार्गावरून वळविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / दादर येथे येणाऱ्या अप मेल-एक्सप्रेस कल्याण ते ठाणे / विक्रोळी दरम्यान सहाव्या मार्गावरून वळविण्यात येतील.
हार्बर मार्ग
कुठे : कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३४ ते दुपारी १५.३६ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेल कडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला तसेच पनवेल ते वाशी विभागात विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत ठाणे ते वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.

