मुंबई : पाणीपुरवठा विषयक दुरुस्तीमुळे आज, मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  २४ तास काम चालणार असून या कालावधीत मुंबईतील १२ विभागांमध्ये पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीचे जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
nashik water supply saturday marathi news, no water supply in nashik on saturday marathi news
निम्म्याहून अधिक नाशिकमध्ये शनिवारी पाणी बंद
Agitation on behalf of Vanchit Bahujan Aghadi yavatmal
“रिकामी माझी घागर…” पाणी समस्या सोडविण्यासाठी ‘वंचित’चे असेही आंदोलन…
69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार

या कालावधीत वांद्रे ते गोरेगाव, भांडुप, कुर्ला, विद्याविहार या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. तसेच अंधेरी, विलेपार्ले पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहील. अंधेरी पूर्व, दादर , माहीम, गोरेगाव  विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. वांद्रे, खार पश्चिम  विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा कमी कालावधीसाठी होईल आणि काही परिसरात कमी दाबाने होणार आहे.