मुंबई : पाणीपुरवठा विषयक दुरुस्तीमुळे आज, मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  २४ तास काम चालणार असून या कालावधीत मुंबईतील १२ विभागांमध्ये पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन आगम वाहिनीचे जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपासून बुधवार, ३० नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc announces water cut in half of mumbai zws
First published on: 29-11-2022 at 05:02 IST