BMC Budget 2026-27 Updates: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. प्रशासकीय राजवट संपल्यानंतर पहिल्यांदाच ४ वर्षांनंतर महापौरांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प सादर होत आहे. भाजपच्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५ फेब्रुवारीच्या आत सादर करावा असा नियम असला तरी यंदा मुंबई महापालिका निवडणूक तोपर्यंत पार पडलेली होती आणि सत्तास्थापनेच्या प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प वीस दिवस उशीराने सादर होणार आहे. महापौर पदाचे आरक्षण, निवडणूक, पहिली सभा, मग स्थायी समितीची स्थापना या प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे मुंबई महापालिकेचा बहुचर्चित अर्थसंकल्प यंदा प्रथमच उशीराने होत आहे.

Live Updates

BMC Budget 2026-27 Live Updates Mumbai | मुंबई महापालिका बजेट महत्त्वाच्या घोषणा

20:45 (IST) 25 Feb 2026

“वाघ-शेळी एकत्र पाणी पिण्याचे सुवर्णयुग पुन्हा येणार”, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या…

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता आणि सकारात्मक विचार यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही कार्यक्रमात अधोरेखित केले गेले. ...सविस्तर वाचा
18:51 (IST) 25 Feb 2026

मुंबई महानगरपालिकेला ‘शून्य औषधचिठ्ठी’ योजनेचा विसर; अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद नाही…

दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या 'शून्य औषधचिठ्ठी' योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद न केल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोफत औषधे मिळण्याचे स्वप्न अधांतरी राहिले आहे. ...सविस्तर वाचा
18:23 (IST) 25 Feb 2026

आरोग्याच्या आगामी अर्थसंकल्पात २२ टक्क्यांनी वाढ; पीपीपी तत्त्वाबरोबरच आरोग्य सेवा अद्ययावत करण्यावर भर…

मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ७ हजार ४५६ कोटींची तरतूद केली असून, गतवर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढ करत पीपीपी तत्त्वावर अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यावर भर दिला आहे. ...सविस्तर वाचा
16:27 (IST) 25 Feb 2026

मुंबई महानगरपालिकेचा ८०,९५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर, विकास कामांसाठी ४८,१६४ कोटी २८ लाख रुपयाची तरतूद

देशातील श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ८० हजार ९५२ कोटी रुपयाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना सादर केला. ...वाचा सविस्तर
16:01 (IST) 25 Feb 2026

Maharashtra Govt Dues to BMC : राज्य सरकारची थकबाकी १०,९४८ कोटींवर

राज्य सरकारकडून सहाय्यक अनुदान, मालमत्ता कर आदींपोटी मुंबई महानगरपालिकेला तब्बल १०,९४८.५८ कोटी रुपये येणे आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडील तब्बल ७२४१.४४ कोटी रुपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. ...सविस्तर बातमी
15:42 (IST) 25 Feb 2026

BMC Debt : मुंबई महापालिकेवर कर्जाचे ओझे ? मुदतठेवीच्या तिप्पट प्रकल्पांची देणी

पालिकेच्या विविध मोठमोठ्या प्रकल्पांची व विविध विकासकामांची देणी तब्बल २ लाख ४४ हजार कोटींच्या पुढे गेली आहेत. ...सविस्तर वाचा
15:32 (IST) 25 Feb 2026

BMC Budget 2026-27 Live Updates: मुंबई मनपा ८१ हजार कोटींपैकी ३६ हजार कोटींच्या ठेवी मोडणार; कारण काय?

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या एकूण मुदतठेवीमध्ये ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक होते. त्यापैकी ३६ हजार ६२३ कोटी ९ लाख रुपयांच्या ठेवी विविध प्रकल्पासाठी मोडण्यात येणार आहेत.

14:33 (IST) 25 Feb 2026

BMC Budget: मुंबई महानगरपालिकेचा ८० हजार ९५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

BMC Budget 2026: चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा या अर्थसंकल्पाचे आकारमान तब्बल ८.७७ टक्क्यापेक्षाही जास्त आहे. ...सविस्तर बातमी
14:30 (IST) 25 Feb 2026

BMC Education Budget 2026: महापालिकेची राज्य सरकारकडे ७२४१.३८ कोटी रुपयांची थकबाकी

राज्य सरकारकडून मुंबई महानगरपालिकेला ३१ मार्च २०२५ पर्यंत प्रथमिक शिक्षणाच्या खर्चासाठी ५६५५.३० कोटी रुपये, तर माध्यमिक शिक्षणाच्या खर्चापोटी १५८६.०७ कोटी रुपये असे एकूण ७२४१.३८ कोटी रुपये येणे आहे. ...अधिक वाचा
14:27 (IST) 25 Feb 2026

BMC Budget 2026-27 Live Updates: मुंबई महानगरपालिकेचा ८० हजार ९५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर

देशातील सर्वांत श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षांचा तब्बल ८० हजार ९५२ कोटींचा अर्थसंकल्प पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी स्थायी समितीला सादर केला.

13:38 (IST) 25 Feb 2026

BMC Budget 2026-27 Live Updates: शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात ५७३.९८ कोटी रुपयांची वाढ

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शिक्षण विभागाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४२४८.०८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी शिक्षण समिती अध्यक्षांकडे सादर केला. चालू आर्थिक वर्षातील सुधारित अर्थसंकल्पाच्या तुलनेत यात ५७३.९८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

13:06 (IST) 25 Feb 2026

BMC Budget 2026-27 Live Updates: मुंबई मनपाच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय?

मुंबई मनपाच्या अर्थसंकल्पात उत्पन्नाचे प्रमुख पाच स्रोत आहेत. जकात हा पालिकेचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत होता मात्र जकात बंद झाल्यापासून पालिकेला दरमहा राज्य सरकारकडून जीएसटी नुकसान भरपाई मिळते. त्याखालोखाल दुसरा स्रोत म्हणजे मालमत्ता कर. पालिकेच्या ८० हजार कोटींच्या ठेवी असून त्यावरून व्याजातूनही पालिकेला उत्पन्न मिळत असते. तर राज्य सरकारकडे थकीत असलेली येणी देखील उत्पन्न म्हणून ग्राह्य धरली जातात. त्याव्यतिरिक्त पालिकेच्या मालमत्तांमधूनही भाडे, अधिमूल्य, मक्ता भूभाडे, पालिकेच्या मालकीच्या जमिनीवरील पुनर्विकासापोटीचे अधिमूल्य यातूनही महसूल मिळत असतो.

13:00 (IST) 25 Feb 2026

महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ४२४८.०८ कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शिक्षण विभागाचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ४२४८.०८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी शिक्षण समिती अध्यक्षांकडे सादर केला. ...सविस्तर वाचा
12:53 (IST) 25 Feb 2026

BMC Budget 2026-27 Live Updates: अर्थसंकल्प यंदा ८० हजार कोटींवर जाणार

चालू आर्थिक वर्षात मुंबई महापालिका प्रशासनाने ७४,४२७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. आधीच्या वर्षी ६५,१८० कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्यामुळे चालू अर्थसंकल्पात १४.१९ टक्के वाढ झाली होती. यंदाही अर्थसंकल्पाचे आकारमान वाढणार असल्याची चर्चा आहे.

12:51 (IST) 25 Feb 2026

BMC Budget 2026-27 Live Updates: शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प..

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा दोन भागात मांडला जातो. प्राथमिक शिक्षण हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य असल्यामुळे शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जातो. शिक्षणासंबंधी निर्णय घेण्यासाठी पालिकेची स्वतंत्र अशी शिक्षण समिती ही वैधानिक समिती असून शिक्षण समितीचा अध्यक्ष हा स्थायी समितीचा पदसिद्ध सदस्य असतो. या शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वात आधी शिक्षणचा अर्थसंकल्प मांडला जातो. शिक्षण अर्थसंकल्पाचेच आकारमान हे सुमारे तीन हजार कोटींच्या आसपास असते.

12:50 (IST) 25 Feb 2026

BMC Budget 2026-27 Live Updates: यंदाचा अर्थसंकल्प २० दिवस उशीरा

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५ फेब्रुवारीच्या आत सादर करावा असा नियम असला तरी यंदा महापालिका निवडणूक तोपर्यंत पार पडलेली होती व सत्तास्थापनेच्या प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प वीस दिवस उशीराने सादर होणार आहे.

BMC Budget 2026-27 Today: Mumbai Municipal Corporation Expected to present 75,000 Crore Budget

मुंबई महापालिका अर्थसंकल्प २०२६-२७: आज सादरीकरण (लोकसत्ता टिम)