BMC Budget : आरोग्यासाठी यंदा १६८०.१९ कोटी रुपये तरतूदीचा प्रस्ताव | BMC Budget: allocation of Rs 1680.19 crore for health department this year | Loksatta

BMC Budget : आरोग्यासाठी यंदा १६८०.१९ कोटी रुपये तरतूदीचा प्रस्ताव

मुंबई महानगरपालिकेने २०२२-२३ च्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागासाठी १२८७.४१ कोटी रुपयांची तरतूद केली होती.

BMC
( संग्रहित छायाचित्र )

मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यासाठी १६८०. १९ कोटी रुपये इतकी तरतूद प्रस्तावित आली. त्यात उपनगरीय रुग्णालयांचा पुनर्विकास, हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान याचा विस्तार करण्यासाठी ५० कोटी, स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी १.४० कोटी, असंसर्गजन्य आजारांसाठी १२ कोटी, शीव योग केंद्रासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

मुंबई महानगरपालिकेने २०२२-२३ च्या सुधारित अर्थसंकल्पामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागासाठी १२८७.४१ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजमध्ये १६८०.१९ कोटी इतकी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच ३९२.७८ कोटी रुपये इतकी प्रस्तावित वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा… BMC Budget : विकासकामांसाठी २७ हजार कोटींची तरतूद, ५२ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर

हेही वाचा… मुंबई महानगरातील रेल्वे प्रकल्पांना बळ; केंद्रीय अर्थसंकल्पात १,१०१ कोटी रुपयांची तरतूद 

मुंबई महानगरपालिका आरोग्य अर्थसंकल्प वैशिष्ट्ये

२०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये १२८७.४१ कोटी आणि २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये १६८०.१९ कोटी इतकी तरतूद प्रस्तावित

  • राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मेट्रोपॉलिटीन सर्व्हिलन्स युनिटची स्थापना
  • नागरीकांना परवडणाऱ्या दरांत अत्याधुनिक चाचण्या उपलब्ध करुन देण्याकरीता के.ई.एम., नायर व सायन रुग्णालयात प्रतिनग १५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक सी.टी.स्कॅन मशीन खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्याबरोबरच, के.ई.एम., नायर व शीव रुग्णालयात प्रतिनग २५ कोटी इतक्या अंदाजित खर्चाची प्रत्येकी एक ३ टेस्ला एम. आर. आय. यंत्रणा उभी करण्यात येणार आहे.
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेसाठी २०२२-२३ च्या सुधारीत अर्थसंकल्पामध्ये ७५ कोटी आणि सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५० कोटी रुपये तरतूद
  • स्मशानभूमींच्या सुशोभिकरणासाठी १.४० कोटी रुपये तरतूद
  • किटकनाशके आणि फॉगिंग मशीनचा पुरेसा साठा उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यासाठी ३५ कोटी रुपये
  • असंसर्गजन्य रोग कक्षासाठी १२ कोटी रुपये
  • शिव योग केंद्रांसाठी ५ कोटी रुपये

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 12:31 IST
Next Story
BMC Budget : विकासकामांसाठी २७ हजार कोटींची तरतूद, ५२ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर