मुंबई : चर्नीरोड स्थानकाच्या पूर्वेकडचा परिसर पालिकेने धडक कारवाईद्वारे मोकळा केला आहे. चर्नीरोड पूर्वेला असलेल्या महर्षी कर्वे मार्गावर गेल्या काही आठवडय़ांमध्ये ३२ अनधिकृत झोपडय़ा बांधण्यात आल्या होत्या. पदपथांवर व पदपथानजिक असलेल्या या झोपडय़ांमुळे पादचाऱ्यांना पदपथावर चालण्यास अडथळा येत होता. त्यामुळे पालिकेने ही कारवाई केली.  चर्नीरोड पूर्वेला स्थानकाला समांतर असलेला रस्ता हा गेल्या काही महिन्यांपासून झोपडय़ांनी व्यापला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैफी रुग्णालयाजवळ आणि चर्नीरोड स्थानकालगत असणाऱ्या महर्षी कर्वे मार्गावर पावसाळय़ादरम्यान ३२ अनधिकृत झोपडय़ा बांधण्यात आल्या. त्यामुळे अनेक पादचारी हे पदपथोजिकच्या रस्त्यावरून चालत असल्याने अपघाताची भीती वाढण्यासोबतच वाहतुकीसाठीही अडथळा होत होता. याबाबत तक्रारी आल्यानंतर महपालिकेच्या ‘डी’ विभागाद्वारे कारवाई करण्यात आली. त्यात ३२ झोपडय़ा हटविण्यात आल्या. मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या या कारवाईसाठी महापालिकेच्या ८० कामगार, कर्मचारी, अधिकारी यांचे पथक घटनास्थळी होते. मोठय़ा आकारातील वाहिन्या उचलण्यासाठी वापरण्यात येणारे हायड्रा यंत्र या कारवाईसाठी वापरण्यात आले होते.  झोपडय़ा हटविल्यानंतर या ठिकाणी कीटक नियंत्रण खात्याद्वारे फवारणी करण्यासह संबंधित कचरा डंपरद्वारे तात्काळ हटविण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc demolished 32 unauthorized huts near charni road station zws
First published on: 27-09-2022 at 06:23 IST