आगामी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ च्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत नवीन मतदारांची संख्या सात लाखांनी वाढली असून २०२२ साठी ९८ लाख ७७ हजार ५० मतदारांची नोंद झाली आहे. या प्रारुप यादीनुसार नावातील चुका, इतर कोणत्याही तांत्रिक चुका सुधारण्यासाठी २३ जून ते १ जुलै अशी मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार सुचना हरकती सादर करून मतदारांना आवश्यक ती दुरुस्ती करता येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ३१ मे २०२२ च्या विधानसभा मतदार संघानुसार मतदार याद्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार याद्या पालिकेकडून तयार करण्यात आल्या आहेत. मुंबईत २०१७ मध्ये ९१ लाख ६४ हजार १२५ मतदार होते. २०२२ मध्ये यात सात लाखांनी वाढ झाली आहे. त्यानुसार २०२२ मध्ये ९८ लाख ७७ हजार ५० अशी मतदारसंख्या आहे.

Mahayuti, Maval lok sabha, Maval,
मावळमध्ये महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन
health of two election officials deteriorated due to heat wave In Nagpur
नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…
Maval, Filing of candidature, Shrirang Barne,
मावळमध्ये आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, श्रीरंग बारणे २२ तारखेला, तर संजोग वाघेरे २३ एप्रिलला अर्ज भरणार
Prakash Awade, Lok Sabha, hatkanangle,
आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात; पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली

सूचना-हरकती दाखल करून घेण्यास सुरूवात झाली आहे –

मतदार याद्या पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर तसेच पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील करनिर्धारण व संकलन खात्यातील निवडणूक विभागात पाहता येतील. त्यानुसार या यादीसंदर्भातील सूचना-हरकती दाखल करून घेण्यास गुरुवारपासून सुरूवात झाल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी दिली.

९ जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार –

यादीतील नाव, प्रभाग किंवा इतर माहिती तपासून नागरिकांनी विहित मुदतीत सूचना-हरकती दाखल कराव्यात असे आवाहनही डॉ. संजीव कुमार यांनी केले. सादर सूचना-हरकतींनुसार आवश्यक ते बदल करून ९ जुलैला अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर मात्र कोणतीही सुधारणा करता येणार नाही. नागरिकांना आपल्या सूचना-हरकती नोंदवण्यासाठी वा आवश्यक ती दुरूस्ती करण्यासाठी पालिकेच्या संबंधित विभागीय कार्यालयातील करनिर्धारण व संकलन कार्यालयातील निवडणूक विभागात नागरिकांना संपर्क साधावा.