BMC Mumbai Municipal Corporation Election Results Vote Counting Updates 2026 : मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडलं, त्यानंतर आज (१६ जानेवारी) निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महापालिका निवडणुकीच्या निवडणुकींपैकी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची राज्यात चर्चा झाली. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलेलं होतं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला असून भाजपा-शिंदे सेनेला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान मुंबईचा महापौर कोण होणार? याकडे मुंबई करांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Mumbai BMC Vote Counting LIVE Updates, 16 January 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

18:28 (IST) 17 Jan 2026

Uddhav Thackeray on Election Result: ‘शिंदेंचा पक्ष फोडून भाजपा मुंबईचा महापौर बसवेल’, उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

Uddhav Thackeray on Election Result: शिवसेनेचे (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे विश्लेषण केले. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या युतीला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. शिवसेनेला (ठाकरे) ६५ तर राज ठाकरेंच्या मनसेला केवळ ६ जागा जिंकता आल्या. तर भाजपा ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष झाला आहे. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. महायुतीची संख्या ११८ पर्यंत पोहोचत असल्यामुळे महायुतीचा महापौर बसणार हे नक्की झाले आहे.

सविस्तर वाचा

17:10 (IST) 17 Jan 2026

मुंबईच्या महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "देवाच्या मनात असेल तर..."

“भाजपाला असं वाटत असेल की शिवसेना (ठाकरे) त्यांनी कागदावर संपवली असेल. मात्र, जमिनीवरील शिवसेना ते संपवू शकत नाहीत. भारतीय जनता पक्ष हा कागदावर राहिलेला पक्ष आहे. जमिनीवर राहिलेला पक्ष नाही. आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल”, असं उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

17:09 (IST) 17 Jan 2026

शिवसेना–मनसेच्या जागा का घटल्या? शर्मिला ठाकरेंनी सांगितले पराभवाचे कारण

Maharashtra Municipal Corporation Election Result 2026: शुक्रवारी (१६ जानेवारी २०२६) रोजी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये राज्यभरात भाजपाने आघाडी घेतल्याचे दिसले. राज्यातील २९ महापालिकांपैकी २४ ठिकाणी महायुतीची सत्ता आली. त्यामध्ये ९ महापालिका भाजपाने स्वबळावर जिंकल्या आहेत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रथमच भाजपाने ८९ विक्रमी जागा जिंकल्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अनुक्रमे २९ आणि ३ जागा निवडून आल्या आहेत. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेत पहिल्यांदा भाजपाचा महापौर होणार आहे. ठाकरे बंधुंनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. पण सत्तास्थापनेच्या जादुई आकड्यापर्यंत त्यांना पोहचता आले नाही. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६५ तर राज ठाकरेंच्या मनसे पक्षाने ६ जागा जिंकल्या.

सविस्तर वाचा

16:35 (IST) 17 Jan 2026

उद्धव ठाकरेंची महापालिका निकालावर प्रतिक्रिया; “आमच्या परायजला तेज आहे, भाजपाचा विजय डागळलेला आहे, कारण….”

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला ६५ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेला ६ जागा मिळाल्या आहेत. मात्र त्यांचा महापौर बसणार नाही. कारण मॅजिक फिगर त्यांना गाठता आलेली नाही. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आहे.

वाचा सविस्तर

16:20 (IST) 17 Jan 2026

Marathi Identity Mumbai Election: सविस्तर: मुंबईचे ‘मराठीपण’ कायम राहणार?

BMC Election Analysis: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ६५, तर मनसेचे सहा जण निवडून आले. २०१७ च्या तुलनेत शिवसेनेचे संख्याबळ ८४ वरून ६५ पर्यंत घटले. पण त्याच वेळी भाजपच्या संख्याबळात अपेक्षित वाढ झालेली नाही. भाजपचे गेल्या वेळी ८२ नगरसेवक निवडून आले होते. यंदा हे संख्याबळ ८९ झाले. म्हणजेच भाजपला केवळ सात जागांचा फायदा झाला. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाला २९ जागा मिळाल्या. शिंदे गटाला केवळ शिवसेना ठाकरे गटाची मते मिळालेली नाहीत. भाजपशी युती असल्याने भाजपची हक्काची मते शिंदे गटाकडे हस्तांतरित झाली. याचाच अर्थ मुंबईचा राजकीय कॅनव्हास फारसा बदललेला नाही.

सविस्तर वाचा

15:21 (IST) 17 Jan 2026

"मनात असेल तर तेही होईल...", मुंबईच्या महापौर पदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

"भाजपाला असं वाटत असेल की शिवसेना (ठाकरे) त्यांनी कागदावर संपवली असेल. मात्र, जमिनीवरील शिवसेना ते संपवू शकत नाहीत. भारतीय जनता पक्ष हा कागदावर राहिलेला पक्ष आहे. जमिनीवर राहिलेला पक्ष नाही. आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आपला महापौर व्हायला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल", असं उद्धव ठाकरे यांनी विजयी उमेदवारांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

14:22 (IST) 17 Jan 2026

BMC election results 2026 : ठाकरेंची सत्ता गेल्यानंतर हिंदी वृत्तपत्रात काय, काय आले छापून… पाहा

BMC election results 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल हाती लागले असून अटीतटीच्या लढतीत भाजप-शिंदे महायुतीचे सरकार मुंबई महापालिकेत बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी मराठी भाषा, मराठी माणूस, मुंबई तोडणार अशा मुद्द्यांचा उल्लेख करत निवडणूक लढविली होती. आता मुंबईत ठाकरेंची सत्ता आली नसली तरी हिंदी वृत्तपत्रांमध्ये काय-काय छापून आले वाचूया..

सविस्तर वाचा

13:02 (IST) 17 Jan 2026
मुंबई महापालिकेत मनसेला अपयश आल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "मराठी माणसासाठी आमचा लढा..."

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं. मुंबई महापालिकेत भाजपा-शिंदे सेनेचा मोठा विजय झाला. मात्र, मुंबईत ठाकरे बंधूंना अपयशाला सामोरं जावं लागलं. मुंबईत महापालिकेत मनसेला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत एका ओळीत प्रतिक्रिया दिली आहे. 'मराठी माणसासाठी आमचा लढा सुरूच राहील', असं अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.

12:54 (IST) 17 Jan 2026

Santosh Dhuri On Raj Thackeray: मुंबईत ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर संतोष धुरींची राज ठाकरेंवर जहरी टीका; म्हणाले, ‘मनसेची चेष्टा…’

Santosh Dhuri On Raj Thackeray: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं. मुंबई महापालिकेत भाजपा-शिंदे सेनेचा मोठा विजय झाला. मात्र, मुंबईत ठाकरे बंधूंना अपयशाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईत महापालिकेत मनसेला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. यावरूनच संतोष धुरी यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची चेष्टा झाली अशी खोचक टीका संतोष धुरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

सविस्तर वाचा

12:20 (IST) 17 Jan 2026

मनसेचे नवनिर्वाचित ६ नगरसेवक राज ठाकरेंच्या भेटीला

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. मुंबईत मनसेचे फक्त ६ नगरसेवक निवडून आले. विजयी झालेल्या या ६ नगरसेवकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीवेळी राज ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

12:13 (IST) 17 Jan 2026

मुंबईतल्या निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, “ही लढाई…”

मुंबईसह २९ महापालिकांचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झाला आहे. राज्यातील २९ पैकी २५ महापालिकांमध्ये भाजपाचं कमळ फुललं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची. या निवडणुकीत भाजपा महायुतीला ११६+ जागा मिळाल्या आहेत. मुंबईत भाजपाचा महापौर होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख जयचंद असा केला होता. आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.

सविस्तर वाचा

11:31 (IST) 17 Jan 2026

“मराठी माणसाच्या विरोधात..”; मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांचं चित्र स्पष्ट झालं आहे. महायुतीचा महापौर बसणार हे निश्चित झालं आहे. कारण ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांना बहुमताची संख्या गाठता आलेली नाही. यानंतर आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचे म्हणजेच मनसेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. आता मराठी माणसांना वाचवण्यासाठीची आपली लढाई सुरु झाली आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी पोस्ट केली आहे. जी चर्चेत आली आहे.

सविस्तर वाचा

10:47 (IST) 17 Jan 2026

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया काय?

ही लढाई अजून संपलेली नाही… मराठी माणसाला योग्य सन्मान मिळेपर्यंत अशीच सुरू राहील! असं म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पोस्ट केला आहे.

https://Twitter.com/ShivSenaUBT_/status/2012371589786935665

10:36 (IST) 17 Jan 2026

अजित पवार शरद पवारांच्या भेटीला बारामतीत...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गोविंद बाग या ठिकाणी जाऊन शरद पवारांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. आता पुढे नेमकं काय होणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये पुणे आणि पिंपरीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले होते. पण त्यांना यश मिळू शकलं नाही.

10:23 (IST) 17 Jan 2026

संजय राऊत यांनी आम्ही हा पराभव मानत नाही असं म्हटलं आहे.

आमच्या हातात जर सत्ता आणि पैसा असता तर भाजपालाही देश टिकवता येणार नाही. फडणवीसांना मुख्यमंत्रिपद आणि शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद टिकवता येणार नाही. शिवसेनेचे ६० नगरसेवक फोडले, त्यातले ९० टक्के पराभूत झाले. आमच्याकडून फुटून शिंदेंकडे गेलेले नगरसेवक पराभूत झाले आहेत. आम्ही शिवसेना आणि मनसेने ७१ जागा जिंकल्या. मराठी माणूस आमच्यामागे ठामपणे उभा राहिला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आमचा पराभव झाला हे आम्ही मानत नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

10:19 (IST) 17 Jan 2026

Raj Thackeray on BMC Election Result: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची महानगरपालिका निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया

सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही. आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची , मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही. पण तरीही सांगतो एमएमआर परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया - राज ठाकरे</p>

https://twitter.com/RajThackeray/status/2012379636769157221

22:52 (IST) 16 Jan 2026

Mumbai Municipal Election Result: मुंबईत समाजवादीची मतपेढी एमआयएमकडे - आठ जागांवर विजय

महानगरपालिका निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) पक्षाने प्रस्थापित पक्षांना धक्का दिला आहे. ...अधिक वाचा
22:49 (IST) 16 Jan 2026

BMC Election result 2026: पूर्व उपनगरात बालेकिल्ला राखण्यात पक्षांना यश

भाजपने त्यांचा मुलुंड आणि घाटकोपर हा बालेकिल्ला राखला आहे, तर शिवसेना ठाकरे गटाने विक्रोळी आणि भांडुपमधील त्यांचे गड राखण्यात यश मिळवले आहे. ...अधिक वाचा
22:43 (IST) 16 Jan 2026

Mumbai municipal Election Result 2026: मातोश्रीच्या अंगणात ठाकरेच सरस; शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिणी कांबळे विजयी, शिंदेंच्या सुमित वजाळेंचा केला पराभव

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ९३ च्या अर्थात मातोश्रीच्या अंगणातील लढाईकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले होते. तेथे शिवसेना (ठाकरे) विरुद्ध शिवसेना (शिंदे) अशी लढत होती. ...सविस्तर वाचा
22:31 (IST) 16 Jan 2026

BMC Election result 2026: पश्चिम उपनगरात भाजपची सरशी

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत पश्चिम उपनगरात महायुती सरस ठरली आहे. त्यातही सर्वाधिक उमेदवार भाजपचे निवडून आले आहेत. ...अधिक वाचा
22:31 (IST) 16 Jan 2026

BMC Election result 2026: चेंबूरमधील वादग्रस्त लढतीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय

उमेदवारांना पैसे वाटप आणि मतदान यंत्रणेत छेडछाड केल्याच्या आरोपावरून चेंबूरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद झाला होता. ...सविस्तर बातमी
22:31 (IST) 16 Jan 2026

BMC Election result 2026: चेंबूरमधील वादग्रस्त लढतीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय

उमेदवारांना पैसे वाटप आणि मतदान यंत्रणेत छेडछाड केल्याच्या आरोपावरून चेंबूरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद झाला होता. ...सविस्तर बातमी
22:29 (IST) 16 Jan 2026

Eknath Shinde : मुंबई महापौर पदाच्या दाव्यावर, एकनाथ शिंदे काय म्हणाले…

मुंबईत महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर महापौर पदापेक्षा शहराचा विकास आणि जागतिक दर्जाचा बदल महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ...वाचा सविस्तर
21:18 (IST) 16 Jan 2026

BMC Election Result LIVE Updates: नितेश राणेंच्या व्हिडीओवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, “उन्माद…”

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी एक हसतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या व्हिडीओबाबत प्रश्न विचारण्यात आला. विजयानंतर उन्माद करू नका, असे आवाहन करूनही नितेश राणेंच्या व्हिडीओबाबत काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, राणे आणि ठाकरे यांचा एक इतिहास आहे. तरीही विजयाचा आनंद साजरा करताना उन्माद करू नका, असे माझे मत असल्याचे ते म्हणाले.

20:36 (IST) 16 Jan 2026

BMC Election Result LIVE Updates: मुंबई खड्डेमुक्त होणार, आरोग्य सुविधा वाढणार, काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुंबईमध्ये जे प्रकल्प थांबले होते, ते आता सुरू होतील. रस्ते, वाहतूक कोंडी, आरोग्य, सिव्हरेज प्लँट यावर आम्ही काम करणार असून मुंबईला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

20:34 (IST) 16 Jan 2026

BMC Election Result LIVE Updates: महापालिकेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

विकास हाच ब्रँड लोकांनी स्वीकारला असून इतर ब्रँडना जनतेने नाकारले आहे. भाजपा-शिवसेनेची (ठाकरे) युती लवकरच सत्ता स्थापनेच्या जवळ पोहोचेल, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. महानगरपालिकेचा निकाल लागत असताना पहिल्यांदाच एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली.

20:19 (IST) 16 Jan 2026

BMC Election Result LIVE Updates : दादरमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार विजयी

मुंबईत वॉर्ड क्र. १९२ मधून मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार विजयी झाले आहेत. शिवसेना भवनाच्या प्रभागातून ते निवडणूक लढवत होते. या विजयाचे श्रेय त्यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले.

20:16 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026: शिवसेनेने (ठाकरे) वरळी राखली…

मनसेच्या वाट्याला गेलेल्या प्रभागातील बंडखोरीमुळे युतीला पराभव पत्करावा लागला. या प्रभागात शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवाराचा विजय झाल्याने शिवसैनिकांच्या (ठाकरे) जिव्हारी लागला. ...सविस्तर वाचा
20:16 (IST) 16 Jan 2026

BMC Election Results 2026: शिवसेनेने (ठाकरे) वरळी राखली…

मनसेच्या वाट्याला गेलेल्या प्रभागातील बंडखोरीमुळे युतीला पराभव पत्करावा लागला. या प्रभागात शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवाराचा विजय झाल्याने शिवसैनिकांच्या (ठाकरे) जिव्हारी लागला. ...सविस्तर वाचा
20:07 (IST) 16 Jan 2026
'राज ठाकरे बिगेस्ट लुजर ठरतील', मुख्यमंत्री फडणवीसांचे ते वाक्य खरे ठरले? नेमके काय म्हणाले होते?

CM Devendra Fandavis on Raj Thackeray: मुंबई महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज ठाकरे बिगेस्ट लुजर असतील असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. ...वाचा सविस्तर

BMC Election Result LIVE Updates

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या सर्व घडामोडी जाणून घेऊयात. (फोटो-संग्रहित छायाचित्र)