मुंबई: मुंबई महापालिकेच्या प्प्रभाग २०७ मधून भाजपचे रोहिदास लोखंडे यांचा विजय झाला. प्रभाग २०७ मध्ये भारतीय जनता पार्टीने (भाजप) वर्चस्व गाजवले आहे. भाजपचे उमेदवार लोखंडे रोहिदास मधुकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली आहे.

या निवडणुकीत प्रभाग २०७ मधून एकूण १३ उमेदवार रिंगणात होते. मुख्य लढत भाजप, मनसे आणि अखिल भारतीय सेना यांच्यात पाहायला मिळाली. इतर उमेदवारांना मिळालेली मते ३७४ पेक्षा कमी आहेत. ‘नोटा’ (NOTA) पर्यायाला ३९८ मते मिळाली आहेत. २४,८१० मते वैध ठरली.

विजयी उमेदवार रोहिदास मधुकर लोखंडे हे भायखळा (पश्चिम) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या विजयामुळे या भागात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. मनसेच्या शलाका हरयाण यांनी भाजपला कडवी झुंज दिली, मात्र १३१८ मतांच्या फरकाने लोखंडे विजयी झाले. लोखंडे यांना ८०४२ मते मिळाली.

शलाका यांना ६७२४ तर अखिल भारतीय सेनेच्या योगिता गवळी यांना ६३७७ मते मिळाली.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपकडून उभे राहिलेले लोखंडे यांना मराठी मताचा फायदा झाला. मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे समर्थन असूनही शलाका यांना विजयश्री खेचून आणता आला नाही.