BMC Mumbai Civic Body Poll Updates: गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुका अखेर पार पडत असून आज मुंबईतल्या २२७ वॉर्डसाठी मतदान होत आहे. एकीकडे ठाकरे बंधूंची युती तर दुसरीकडे भाजपा व शिंदे गटाची महायुती यामुळे मुंबईतली लढत दुरंगी होणार असं वाटत असतानाच काँग्रेसनं वंचितशी आघाडी करून तिसरा गट निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालं. आज मुंबईत मतदान होत असून उद्या म्हणजेच १६ जानेवारी रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केले जातील.
BMC Election Voting Live Updates: मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये आज मतदान...
Bmc Poll 2026 : ‘भगवे टी-शर्ट’ वादग्रस्त… भगवे गार्ड हद्दपार, तर परप्रांतीय तरुण पोलिसांच्या ताब्यात
BMC Election Result 2026 Time: २३ मतमोजणी कक्षात सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत आज (दिनांक १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (Strong Room) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पोलिस खात्याकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे.
BMC Election LIVE Updates: टपाली मतपत्रिकांच्या पेट्या आता थेट मतमोजणीच्या दिवशीच बाहेर काढणार
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत टपाली मतपत्रिकांबाबत दिलेले एक पत्र चुकून प्रसारित झाले होते. ते पत्र तात्काळ मागे घेऊन सुधारित पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या अभिरक्षा कक्षातून बाहेर काढल्या जाणार नाहीत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणीच्या दिवशीच टपाली मतपत्रिकांच्या पेट्या आणि मतदान यंत्रे अभिरक्षा कक्षातून बाहेर काढण्यात येतील. त्या वेळी प्रभागनिहाय विलगीकरणही होईल. उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहावेत.
BMC Election Voting 2026: मुंबईच्या भांडूपमध्ये दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ
मुंबईच्या भांडूपमध्ये दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. आदर्शनगर परिसरात कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले
BMC Election 2026 Updates: धारावीत मतदान केंद्रावर गोंधळ
धारावीत एका मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. एक मतदार मतदानासाठी आल्यानंतर त्याला समजले की त्यांच्या नावावर अगोदरच कोणीतरी मतदान करून गेले होते.
मतदार यादीचा गोंधळ, मतदार त्रस्त
सुजाता शिवाजी राबाडे,
दोन वाजल्यापासून मतदान करण्यासाठी फिरत आहे. आधी ९५२ नंबर ला नाव आहे असे सांगितले त्याठिकाणी दुसऱ्या कोणाचे नाव आले, मी शाखेत जाऊन नाव चेक केले पुन्हा ९३० नंबर ला नाव होते, ती माहिती घेऊन रांगेत उभी राहिली तर दुबार नाव आहे असे म्हंटले गेले, मग फॉर्म भर म्हंटले माझ्याकडे पेन नसल्याने बाहेर बूथ वर असलेल्या त्यांच्याच माणसांकडून फॉर्म भरायला गेले तर नाव लिहील नंतर विचारले आधी मतदान कधी केले… एक वर्षाआधी मतदान केलेली तारीख मला लक्षात नाही… मला मतदान करायचे आहे माझ्या पतीला दिसत नाही तरी मी मतदानाला आणले आहे… माझेच मतदान नाही त्यांना कसे करणार…
लोकशाहीची परंपरा जपली; वाणी कुटुंबातील तीन पिढ्यांचे मतदान
घाटकोपर पूर्व राजावाडी चित्तरंजन सोसायटीच्या तीन पिढ्या यांनी राजावाडी शाळा येथे मतदान केले बाबुराव वाणी ९४, प्रकाश बाबुराव वाणी ६३, अजिंक्य प्रकाश वाणी २९, वडील, मुलगा,नातू अशा तीन पिढ्या यांनी मतदानाचा हक्क बजावला.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह

अंधेरी, ॲंटॅाप हिल आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व सूचना केल्या
BMC Polls 2026 : उमेदवारांच्या माहितीचे फलकही गायब; ज्येष्ठ आणि दिव्यांगांचेही हाल!
Mumbai BMC Election 2026 Voting: पराभवानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी सुरू- देवेंद्र फडणवीस
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मतदानावेळी लावलेली शाई पुसली जात असल्याने निवडणूक आयोगावर टीका केली होती. यावर प्रत्युत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ठरवते. यापूर्वीही मतदानावेळी मार्कर पेन वापरण्यात आले आहेत. तरीही कुणाचे आक्षेप असतील तर निवडणूक आयोगाने त्याकडे लक्ष द्यावे. मात्र मला असं वाटतंय की उद्या पराभवानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी सुरू आहे"
वडाळामध्ये महिला उमेदवाराच्या पतीचे निधन
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
दिनांक १५ जानेवारी २०२६
दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : ४१.०८%
'हातावरील शाई पुसली जाणे गंभीर', मतदानानंतर राज ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सहकुटुंबीय मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला. या निवडणुकीत 'पाडू' नावाचे नवीन मशीन आणले त्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देणे आवश्यक होते. पण त्यावर खुद्द महापालिकेचे आयुक्त स्पष्टीकरण देत आहे, असं ते म्हणाले.
'पाडू' मशीनवर आक्षेप-
मतदान केल्यानंतर हातावर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याचे समोर आले आहे. त्यावर राज ठाकरेंनी टीका केली. ते म्हणाले, "हातावरील शाई पुसली जाणे ही खूप गंभीर बाब आहे. तसेच काही ठिकाणी दुबार मतदार सापडत आहेत. मतमोजणीच्या वेळी वापरले जाणारे 'पाडू' मशीनवर राज ठाकरेंनी आक्षेप घेतला. त्या मशीनबद्दल आम्हाला काहीच माहिती दिली नाही". तसेच उमेदवार मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदारापर्यंत पोहोचू शकतात, या बदलावरही राज यांनी टीका केली.
BMC Election 2026 Polling Live Updates: रडायचं असेल तर लढता कशाला? आशिष शेलारांची ठाकरे बंधूंवर टीका
उद्धव ठाकरेंच्या बुद्धीमध्ये हेराफेरी झाली आहे, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी दिली. पुढे बोलताना शेलार म्हणाले, विरोधकांच्या राजकीय मेंदूमध्ये केमिकल लोचा झाला आहे. निवडणुकांच्या दिवशी पत्रकार परिषद कशी घेतली? रडायचं असेल तर लढता कशाला? असे प्रश्नही शेलार यांनी विचारले.
टी-शर्टमुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कांजुर–भांडुप–विक्रोळी मतदारसंघात वातावरण तापले
या टी-शर्टवर छापण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा, “मी मराठी” आणि “मराठी माणसा जागा हो…” ही ठाम व स्वाभिमानी घोषणा
महायुतीचे उमेदवार वारंवार पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करत असून, “हा टी-शर्ट घालू देऊ नका” असा दबाव यंत्रणांवर टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
इतकेच नव्हे तर काही मतदान केंद्रांवर तर या टी-शर्टला थेट मतदान अधिकारी (Polling Officer) यांनीही विरोध केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे...
कोणत्याही निवडणूक आयोगाच्या SOP, आचारसंहिता किंवा नियमांमध्ये असा कोणताही उल्लेख नाही की “मी मराठी” किंवा अशा स्वरूपाचा टी-शर्ट घालण्यास बंदी आहे.
Nithin Kamath: मुंबई शेअर बाजाराला बीएमसी निवडणुकीसाठी सुट्टी, नितीन कामथ यांची नाराजी; म्हणाले, “स्थानिक निवडणुकीसाठी…"
नावे गायब, केंद्रे वेगळी; वरळी–प्रभादेवीत मतदार गोंधळात
वरळी, प्रभादेवी परिसरात मोठ्या प्रमाणावर मतदार यादीत नाव सापडत नसल्याच्या तक्रारी आहेत. एकाच कुटुंबातील नावे दोन वेगळवेगळ्या मतदान केंद्रावर असल्याच्या तक्रारी आहेत.
खूप तक्रारी आल्यामुळे वरळी परिसरातील खान अब्दुल गफार खान मार्गावरील बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी सी फेस शाळेतील मतदान केंद्रावर मतदार यादीतून मतदारांचे नाव शोधून देण्यासाठी पालिका कर्मचारी मदत करत होते.
Mumbai Civic Election 2026: दुपारी दीड वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेत २९.९६ टक्के मतदान
मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले जात आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
दिनांक १५ जानेवारी २०२६ : दुपारी १.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : २९.९६ %
Mumbai BMC Voting Updates: मशीनमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपावरून चेंबूरमध्ये मोठा तणाव
ऑनलाईन माहिती अचूक, यादीत नावच नाही; कुर्ल्यात मतदारांची दमछाक
कुर्ल्यात मतदार यादीत नाव सापडत नसल्याने अनेक मतदारांना मतदान केंद्रावर हेलपाटे घालावे लागत आहेत. ऑनलाईन संकेतस्थळावरून उपलब्ध झालेला बूथ क्रमांक, मतदान केंद्र, पत्ता आदी माहितीच्या आधारे मतदान करण्यासाठी बूथवर गेल्यास संबंधितांना मतदार यादीत नाव नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांची दमछाक होत असून पालिका कर्मचारी व मतदार यांच्यात शाब्दिक वाद होत आहेत.
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सुविधांकडे दुर्लक्ष; उन्हात करावे लागते काम
निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. अनेक केंद्रांमध्ये मंडप उभारले नसल्याने त्यांना सावलीचा आसरा घेत काम करावे लागत आहे. उन्हामुळे कर्मचाऱ्यांना वारंवार टेबल एका जागेवरून दुसरीकडे हलवावे लागत आहेत.
विक्रोळीत टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक ११९ मध्ये बोगस मतदान सत्य आले समोर
विक्रोळीतील टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक ११९ मधील सिद्धीविनायगर शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेश शुक्ला हे दुपारी १२ वाजता मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर सकाळीच मतदान झाल्याचे उघडकीस आले. ही बाब त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना बॅलेट द्वारे मतदान करण्याची मुभा उपलब्ध करण्यात आली.
गोरेगाव: मतदान करण्यास गेल्यानंतर समजले की आपल्या नावाने आधीच मतदान झाले आहे.
प्रभाग ११४ मध्ये जुनी मतदार यादी वापरली; मतदान केंद्रावर गोंधळ
भांडुप पश्चिम, प्रभाग क्रमांक ११४ तील यशवंत शाळेतील मतदान केंद्रावर जुनी मतदार यादी देण्यात आली. त्यामुळे यादीतील अनुक्रमांक जुळत नसल्याने प्रचंड गोंधळ झाला. दुपारपर्यंत ही समस्या सोडवण्यात निवडणूक अधिकाऱ्यांना यश आले नाही. त्यामुळे मतदारांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागले. अखेर काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य केले.
शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही
मुंबई, दि.१५ :बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.
Mumbai Municipal Election 2026 Live : संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल!
दुबार किंवा बोगस मतदार पकडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याना ठेचून काढू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवसेना-मनसेच्या भगवा गार्डवर त्यांचा रोख दिसतोय. मुख्यमंत्री साहेब, हरामचा पैसा वाटपावरून सध्या 'शहा सेने'चे लोक भाजपाच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या! आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत, तूर्त इतकेच! जय महाराष्ट्र! - संजय राऊत</p>
Maharashtra Corporation Election Voting LIVE Updates : बोटावरील शाईवरून आरोप-प्रत्यारोप, एकनाथ शिंदेंनी थेट साधला निवडणूक आयोगाच्या आयुक्तांशी संपर्क, म्हणाले…
राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील विविध मतदान केंद्रांवरील परिस्थिती, गोंधळ, मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
सिद्धीविनायगर शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस
विक्रोळीतील टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक ११९ मधील सिद्धीविनायगर शाळेतील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेश शुक्ला हे दुपारी १२ वाजता मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर सकाळीच मतदान झाल्याचे उघडकीस आले. ही बाब त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना बॅलेट द्वारे मतदान करण्याची मुभा उपलब्ध करण्यात आली.
गोरेगाव मोतीलाल नगर पत्राचाळ परिसरात अनेक मतदार केंद्रावर मतदारांची नाव नसल्याने गोंधळ

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेची जनजागृती<br />(संग्रहित छायाचित्र)
BMC Election Voting Updates: मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये आज मतदान...
