गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील अनधिकृत बांधकाम करण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाली आहे. स्थानिकांनी केलेल्या या दगडफेकीत पालिकेचे अनेक कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

गोवंडीमधील शिवाजीनगर भागात अनधिकृत बांधकामांची संख्या फार मोठी आहे. या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी गेले असताना त्यांना स्थानिकांनी विरोध केला. कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर स्थानिकांनी दगडफेक केल्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. अखेर ३०० ते ४०० पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

गोवंडीतील अनेक बांधकामे अनधिकृत आहेत. शिवाय झोपडपट्टीतील अनेक घरे १४ फूटांपेक्षाही अधिक उंचीची आहेत. झोपडपट्टीतील घरे १४ फूटांपेक्षा अधिक उंच नसावी, हा नियम आहे. मात्र गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघन झाले आहे.