महापालिकेला १० लिटरचे ४५ ‘प्राणवायू कॉन्सनट्रेटर’

करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये महानगरपालिकेने तयार केलेल्या नियमावलीचे मुंबईकर नागरिकांनी पालन केले.

मुंबई : महानगरपालिकेला देण्यात येणारे १० लिटरचे ४५ प्राणवायू कॉन्सन्ट्रेटर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे गुरुवारी भायखळा येथील महापौर निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये विभागाचे संचालक आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये महानगरपालिकेने तयार केलेल्या नियमावलीचे मुंबईकर नागरिकांनी पालन केले. करोनाचे संकट अजूनही टळलेले नसून नागरिकांनी नेहमी मुखपट्टी वापर करावा, असे आवाहन किशोरी पेडणेकर यावेळी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bmc gets 45 oxygen concentrators of 10 liters akp