लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: नालेसफाईच्या कामांबाबत तक्रार करण्यासाठी मुंबई महानगरापालिकेने आता १५ जूनपर्यंतची मुदत दिल्याचे जाहीर केले आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी पालिकेने १ जूनपासून ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिली होती. पहिल्या पाच दिवसात १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला

महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांवर नागरिकांना अभिप्राय नोंदवता यावा, तसेच रस्त्यांवरील कचर्‍याची तक्रार करता यावी, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या होत्या. नालेसफाईच्या पाहणीवेळी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते. त्यामुळे नागरिकांना आपल्या भागातील नाल्यातून गाळ काढण्याबाबतची तक्रार नोंदविण्यासाठी व्हॉट्सॲप चॅटबॉट प्रणालीच्या माध्यमातून एक मदतक्रमांक दिला होता. मात्र केवळ १५ जुनपर्यंतच तक्रार करता येणार असल्याचे आता प्रशासनाने जाहीर केले आहे.

हेही वाचा… मुंबई : राज्यात डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत घट

मुंबईतील नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून १०० टक्के गाळ काढण्यात आला असल्याचा दावा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. ३१ मे पर्यंत नाल्यातून गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. मात्र एक आठवडा आधीच हे काम पूर्ण झाले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र पहिल्या पाच दिवसात आलेल्या तक्रारीची संख्या पाहता १०० टक्के नालेसफाई केल्याच्या पालिका प्रशासनाच्या दाव्याबाबात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कुठे तक्रार करायची

नागरिकांना ९३२४५००६०० या क्रमांकावर आपली तक्रार किंवा अभिप्राय नोंदवता येणार आहे. १ जून २०२३ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाची व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक कार्यरत झाली आहे. या ठिकाणी तक्रार केल्यानंतर २४ तासात तक्रार निवारण केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.