बकरी ईदनिमित्त दर वर्षी मोठय़ा प्रमाणात बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. या कुर्बानीसाठी पालिकेकडून लागणारी परवानगी तात्काळ मिळावी यासाठी पालिकेने नुकतेच एक मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपवर कुर्बानी देणाऱ्या व्यक्तीने त्याची संपूर्ण माहिती दिल्यास मोबाइलवरच त्याला तत्काळ परवानगी मिळणार आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना होणारा मनस्ताप आणि रहिवाशांचा वेळदेखील या अ‍ॅपमुळे वाचणार आहे.

येत्या २ सप्टेंबरला संपूर्ण देशात बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे. मुस्लीम बांधव त्यांच्या अर्थिक परिस्थितीनुसार बकऱ्यांची कुर्बानी देत असतात. मुंबई शहरातदेखील मोठय़ा प्रमाणात कुर्बानी दिली जात असल्याने आतापासूनच मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृह येथे बकरे खरेदीला सुरुवात झाली आहे.

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च
dombivli, shivsena corporator, two arrested in dombivli
डोंबिवलीत शिवसेना नगरसेवकाच्या नावाने पैसे उकळणारे दोन जण अटकेत
navi mumbai, 12 year old boy killed
शरीर सूखासाठी १२ वर्षीय बालकाचा खून, नवी मुंबई पोलिसांनी १६ तासांत मारेकऱ्याला ताब्यात घेतले

दर वर्षी देवनार पशुवधगृहातून कुर्बानीसाठी दोन ते अडीच लाख बकऱ्यांची विक्री होते. त्यामुळे या सर्वाना एकाच वेळी परवानगी देणे पालिकेला शक्य होत नाही. याशिवाय ही परवानगी देताना पालिका कर्मचाऱ्यांना मोठा मनस्तापदेखील सहन करावा लागतो.  या सर्वातून सुटका करण्यासाठी पालिका अधिकऱ्यांनी एक मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे.

येत्या २१ ऑगस्टला हे अ‍ॅप पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. या अ‍ॅपमध्ये कुर्बानी देणाऱ्या व्यक्तीने एक ओळखपत्र आणि त्याची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर तत्काळ त्याला या कुर्बानीसाठी पालिकेकडून परवानगी मिळणार आहे.

देवनार पशुवधगृह हे मुंबई शहरातील एकमेव पशुवधगृह असल्याने या ठिकाणी दर वर्षी बकरी ईदच्या निमित्ताने मोठी गर्दी असते. त्यामुळे पालिकेनेदेखील बकरी ईदनिमित्त जोरदार तयारी सुरू केली आहे. बकरे घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी पालिका पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती या वेळी देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेट्टे यांनी दिली आहे.