Exit Poll Result of BMC Mumbai : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी मतदान झालं. मुंबईतील काही मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यामुळे दिवसभर आरोप-प्रत्यारोपाने राजकारण ढवळून निघालं आहे. आता १६ जानेवारी रोजी सर्वच महापालिकेचे निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याच लक्ष लागलेलं आहे. मात्र, त्याआधी आज सायंकाळी एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले आहेत.

मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? मुंबईचा महापौर महायुतीचा होणार की ठाकरे बंधूंच्या युतीचा होणार? तसेच काँग्रेस आणि वंजित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार? राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत एक्झिट पोल्सने काय अंदाज वर्तवले आहेत? कोणत्या एक्झिट पोल्सनुसार कोणत्या पक्षाला किती जागा निवडून येतील? याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबईत सत्तापालट? ठाकरे बंधूंना धक्का?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतचे आतापर्यंत जेव्हीसी, एक्सिस माय इंडिया-आज तक, प्राब आणि जनमत यांचे एक्झिट पोल्सचे कल समोर आले आहेत. या कलानुसार मुंबईत महायुती सत्ता मिळवताना दिसत आहे. मुंबई मनपाच्या २२७ जागांमध्ये बहुमताचा आकडा ११४ आहे. यापैकी जवळपास सर्वच एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार महायुतीला यश मिळ्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एक्झिट पोल्सचे अंदाज काय आहेत?

डीव्ही रिसर्च

-महायुती : भाजपा-शिवसेना शिंदे : १०७ ते १२२ जागा
-ठाकरे बंधू युती : ६८ ते ८३ जागा

अ‍ॅक्सिस माय इंडिया

-भाजपा-सेना – १३१ ते १५१
-ठाकरे बंधू -५८ ते ६८
-काँग्रेस -१२ ते १६ जागा

जेव्हीसी (JVC)

-भाजपा-सेना -१३८
-ठाकरे बंधू -५९
-काँग्रेस -२३

पोल्स ऑफ पोल्स

भाजपा-सेना -१०७ ते १२२
ठाकरे बंधू -६८ ते ८३
काँग्रेस व वंचित -११ ते २५
इतर -८ ते १५

जनमत

भाजपा-सेना – ४२ ते ४५
ठाकरे बंधू – ३४ ते ३७
काँग्रेस-वंचित – १३ ते १५
इतर – ६ ते ८

ठाण्याचा गड शिंदेंनी राखला? पाहा JDS Exit Poll ची आकडेवारी

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला ६९ ते ७६ जागा मिळाल्याची शक्यता जेडीएस एक्झिट पोलने वर्तवली आहे, तर भाजपाला २६ – ३० जागा मिळण्याचा अंदाज जेडीएस एक्झिट पोलने वर्तवला आहे.