मुंबई : एम पूर्व व एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ वाजेपासून शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कार्यवाहीदरम्यान एम पूर्व विभागातील काही भागांतील (प्रभाग क्रमांक १४६, १४७ व १४८) तसेच एम पश्चिम विभागातील काही भागांतील (प्रभाग क्रमांक १५४ व १५५) पाणीपुरवठा एकूण ३० तासांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

एम पूर्व व एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी तुर्भे निम्नस्तरीय जलाशय येथे १२०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवर १२०० मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. तसेच, तुर्भे निम्नस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा होणाऱ्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीचे टनेल शाफ्टला जोडणाऱ्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या जलजोडणीची कार्यवाही केली जाणार आहे.

यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील ३ दिवस पाणी उकळून-गाळून प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

एम पूर्व विभाग

  • १) एच. पी. सी. एल. रिफायनरी, एच. पी. सी. एल. वसाहत, वरुण बेव्हरेजेस, बी. ए. आर. सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड, बी. पी. सी. एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ (नियमित पाणीपुरवठा २४ तास) (१२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ ते १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)
  • २) आर. सी. एफ. कॉलनी (नियमित पाणीपुरवठा २४ तास) (१२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ ते १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)
  • ३) जुनी रिफायनरी क्षेत्र, भारत नगर, जे. प्लॉट, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, एम. ए. सी. बी. वसाहत, सह्याद्रीनगर, आर. एन. ए. उद्यान, म्हाडा वसाहती, रॉकलाईन इमारती, विष्णू नगर, व्हिडिओकॉन इमारती, एस. जी. केमिकल इमारती, प्रयागनगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६ ते दुपारी २.३०) (१२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ ते १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)
  • ४) ओम-गणेश नगर, राहुल नगर, अशोक नगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३) ( १२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ ते १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)

एम पश्चिम विभाग

  • १) बीपीटी, टाटा, बी. पी. सी. एल., माहुल गाव, मरवली चर्च, माहुल एसआरए, फारुख गल्ली, खडी मशीन, आर. सी. मार्ग, सिंधी सोसायटी, एसआरए इमारती, वाशी नाका, अंबा पाडा, जिजामाता नगर, वित्तसंचयन, साईलीला रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर कॅम्प, गणेश नगर, अशोक नगर, कोकण नगर, वाशीगाव, म्हाडा इमारती, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, मितुल एन्कलेव, म्हैसूर कॉलनी, एम. एस. इमारती, विजय नगर, आर. सी. मार्ग (नियमित पाणीपुरवठा २४ तास) ( १२ फेब्रुवारी रोजी सकाळी २ ते १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार)