अंथरुणास खिळलेल्यांचे आजपासून घरोघरी लसीकरण

अंधेरीतून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात; ४,४६६ व्यक्तींची लसीकरणासाठी नोंद

प्रतिनिधिक छायाचित्र

अंधेरीतून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात; ४,४६६ व्यक्तींची लसीकरणासाठी नोंद

मुंबई : दीर्घ आजारपणामुळे, शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणास खिळून असलेल्या रुग्णांचे घरी जाऊन लसीकरण करण्यास मुंबईत शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. सुरुवातीला अंधेरी, जोगेश्वरीचा पूर्व भाग असलेल्या के  पूर्व विभागापुरतेच प्रायोगिक तत्त्वावर या लसीकरणाची सुरुवात होणार आहे. मुंबईत ४ हजार ४६६ व्यक्तींनी घरी लसीकरणासाठी नावे नोंदवली आहेत.

ज्या नागरिकांना जागेवरून हलताही येत नाही किं वा जे बऱ्याच महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेले आहेत, अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देता येईल का याबाबतची पूर्वतयारी मुंबई महापालिका प्रशासनाने सुरू के ली होती. त्याकरिता मुंबईतील अशा नागरिकांची माहिती गोळा करण्याचे कामही सुरू करण्यात आले होते. आता घरी जाऊन लसीकरण करण्यास  प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. आजारपणासह शारीरिक व वैद्यकीय कारणांनी अंथरुणास खिळलेल्या नागरिकांना लसीकरण केंद्रांवर येणे शक्य होत नाही. त्यांची अडचण लक्षात घेता, अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच जाऊन लस देण्याकरिता राज्य सरकारने चाचणी सुरू के ली होती. त्याकरिता राज्य शासनाने स्थानिक प्राधिकरणांना यासंदर्भात माहिती संकलित करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. हे लसीकरण करण्यासाठी पालिके ला राज्य सरकारच्या नियमावलीची प्रतीक्षा होती. राज्य सरकारने काही प्राथमिक मार्गदर्शक तत्त्वे तयार के ली असून त्या आधारे हे लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर के ले जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील लसीकरण सुरू झाल्यानंतर, कोणकोणत्या बाबी अशा कार्यवाहीमध्ये समाविष्ट कराव्या लागतील, याचा विचार करून पुढील टप्पा हाती घेण्यात येणार आहे.

माहितीसाठी ईमेल

अंथरुणास खिळून असणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करायचे असल्यास त्यांची  नावे, वय, पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणास खिळून असण्याचे कारण इत्यादी माहिती  covidvaccsbedridden@gmail.com या ईमेल आयडीवर मागविण्यात आली आहे.

कोव्हॅक्सिन लस

ज्यांचे लसीकरण करावयाचे आहे, अशी व्यक्ती पुढील किमान ६ महिने अंथरुणास खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमतीपत्र, संबंधित व्यक्ती किं वा नातेवाईक यांनी प्रशासनाला सादर करणे आवश्यक असेल. तसेच, अशा व्यक्तींना कोव्हॅक्सिन ही लस देण्याचे आदेश तज्ज्ञांच्या समितीने दिले आहेत. तज्ज्ञ व्यक्तींच्या उपस्थितीत लसीकरण के ले जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bmc to begin home vaccination drive for bed ridden patients zws