मुंबई : दिवसेंदिवस ढासळारी हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यांत्रिकी झाडू खरेदीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावरील धूळ हटवून स्वच्छता करण्यासाठी सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. आता नवीन नऊ इलेक्ट्रिक झाडू विकत घेण्यात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल, तसेच सर्वत्र सुरू असलेली विविध विकास कामे यामुळे निर्माण होत असलेली धूळ हवेचा गुणवत्ता स्तर खालावण्यास कारणीभूत ठरत आहे. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांतील अधिकाऱ्यांची बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी यांत्रिकी झाडूबाबतही चर्चा करण्यात आली.

High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
air pollution control system has been in dust since three months
पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास

हेही वाचा >>> Video: बेघर महिलांना आधार देणारी ‘उर्जा’; जाणून घ्या संघर्षमय प्रवास

सध्या महानगरपालिकेकडे २७ यांत्रिकी झाडू आहेत. त्याद्वारे दररोज सुमारे २९३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात येते. याचधर्तीवर  आणखी नऊ झाडू खरेदी करण्यात येणार असून प्रत्येक इलेक्ट्रिक झाडूद्वारे दररोज २८ किलोमीटर याप्रमाणे एकूण २५२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करणे शक्य होणार आहे. ताशी ६ कि.मी.या गतीने प्रतिदिन २८ कि.मी., तसेच महिन्याला ८४० कि.मी.लांबीच्या रस्त्याची साफसफाई करण्याची क्षमता या वाहनांमध्ये आहे. ही यांत्रिकी झाडू वाहन विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन खात्याकडे सोपविण्यात येणार आहेत. या वाहनांनी एकत्र केलेला कचरा राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या माध्यमातून कचराभूमीवर नेण्यात येणार आहे. ही वाहने दोन पाळ्यांत चालविण्यात येणार असून प्रत्येक पाळीत चार तास काम होणार आहे.

हेही वाचा >>> मध्य रेल्वे स्थानकात एस्केल्टर सतत का बंद पडतात? अधिकाऱ्यांनी दाखवल्या कुली व प्रवाशांच्या ‘या’ चुका

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०१७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर एक कृती आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व शहरांना बंधनकारक आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असल्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत त्यात सूचना केल्या आहेत. रस्त्यावर साफसफाई करताना हवेत धूळ उडते. त्यामुळे साफसफाईपूर्वी पाण्याची फवारणी करावी, असेही त्यात म्हटले आहे.  त्यामुळे रस्ते व वाहतूक चौकात पाण्याची फवारणी करून स्वच्छता करू शकणारी ५० संयंत्रे, तर सूक्ष्म पद्धतीने पाणी फवारणी करणारी ५० संयंत्रे अशी एकूण वाहन आरूढ १०० संयंत्रे खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हवा शुद्धिकरण करणारी वाहन आरुढ सुमारे २०० संयंत्रे खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे. हवेतील धुळीला अटकाव करण्यासाठी कलानगर, मानखुर्द, हाजी अली, दहिसर आणि मुलुंड चेक नाका या पाच ठिकाणी धूळ कमी करणारी यंत्रणा उभारण्यात येणार असून त्याबाबतची कार्यवाही प्रगतीपथावर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.