मुंबई : ताडदेव येथील बेलासिस पुलाच्या बांधकामात अडथळा ठरणाऱ्या मासळी विक्रेत्या महिलांनी पुनर्वसनाची मागणी केली असून महापालिकेने या महिलांना सुनावणीसाठी ग्रॅन्ट रोड, ताडदेवचा भाग असलेल्या डी विभाग कार्यालयात बोलावून यासंदर्भात चर्चा केली. दरम्यान, महिलांचे पुनर्वसन करण्याबाबत बैठकीत त्यांना आश्वासन देण्यात आले. तसेच, पुनर्वसन होईपर्यंत महिलांच्या गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार नाही, अशीही ग्वाही त्यांना देण्यात आल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिली.

हेही वाचा >>> उत्तरेत ऐन थंडीत बटाटा तापला; पश्चिम बंगालने राज्याबाहेर बटाटा, कांदा विक्री, वाहतुकीस घातली बंदी

maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thieves , jewellery stolen, Sankranti ,
पुणे : संक्रातीच्या दिवशी चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांकडील दागिने चोरीला
Infosys Cognizant controversy
Infosys Vs Cognizant: नामांकित आयटी कंपन्यांनी एकमेकांविरुद्ध खटले का दाखल केले? नेमका वाद काय?
L&T , Subramaniam, 90 Hours Work , Work Hours ,
स्त्रीद्वेष्टेपणा की कर्मचाऱ्यांच्या शोषणाची पूर्वतयारी? 
History , Art , Contemporary Visual Art , Feminist ,
दर्शिका : ‘अनंतकाळच्या माते’ची अनंतकाळची लढाई…
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Cold Play online ticket sales black market mumbai High Court PIL
कोल्ड प्ले ऑनलाईन तिकीट विक्री काळाबाजार प्रकरण : मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

बेलासिस पुलाच्या बांधकामात लगतच्या गाळ्यांतील मासळी विकणाऱ्या अनेक महिलांचे व्यवसाय अडथळा ठरत आहेत. त्यामुळे ही जागा मोकळी करण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. मात्र, मासळी विक्रेत्या महिलांनी पुनर्वसनाचा आग्रह धरला आहे. त्या मागणीबाबत १० डिसेंबर रोजी आंदोलन करण्याचा निर्णय कोळी बांधवांनी घेतला होता. कोळी बांधवांनी आंदोलनाचा निर्णय घेताच पालिकेने सर्व मासळी विक्रेत्या महिलांना अनुज्ञापत्र व आधारकार्ड घेऊन ९ डिसेंबर रोजी पालिका कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले. त्यानुसार उभयतांमध्ये पालिकेच्या डी विभाग कार्यालयात चर्चा झाली. यावेळी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचेही सदस्य बैठकीस उपस्थित होते. पालिकेच्या डी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मासळी विक्रेत्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच, पुनर्वसन होईपर्यंत महिला विक्रेत्यांच्या गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन महिलांना देण्यात आले. पालिकेच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कोळी बांधवांनी आंदोलनाचा निर्णय तूर्तास स्थगीत केला. मात्र, येत्या दहा दिवसांत हे प्रकरण मार्गी लावले नाही, तर महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा निर्णय अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि कोळी बांधवांनी घेतला आहे.

हेही वाचा >>> माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ

बेलासिस पुलालगतच्या मासळी बाजारात २७ महिला मासळी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांपैकी ७ परवानाधारक महिलांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. उर्वरित महिलांची कागदपत्रे तपासणीसाठी पालिकेकडे देण्यात आली असून त्यांच्याही पुनर्वसनाची मागणी पालिकेकडे करण्यात आली आहे. ताडदेव येथील तुळशीवाडी मार्गावर महानगरपालिकेने बांधलेल्या इमारतीत २ गाळे देऊन सर्व महिलांचे एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत पालिकेकडे मागणी केली आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली. याबाबत संबंधित पालिका विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Story img Loader