मुंबई : गोखले पुलाच्या कामामुळे पावसाळ्यात अंधेरी सबवेची कसोटी; पाणी साचू नये म्हणून पंप बसवणार

पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे पालिका प्रशासनाने अंधेरी सबवेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

six large capacity pumps in andheri subway during monsoon season
अंधेरी सबवे (संग्रहित छायचित्र) photo: (Express file)

अंधेरीच्या गोखले पूलाचे काम सुरू असल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अंधेरी सबवे या पर्यायी मार्गाची कसोटी लागणार आहे. पाणी तुंबण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मार्गावर मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसवण्यात येणार आहेत. अंधेरी पूर्व आणि पश्चिम जोडणारा गोखले पूल नोव्हेंबरमध्ये बंद करण्यात आल्यामुळे अंधेरी परिसरातील नागरिकांना कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल आणि अंधेरी सबवे हे दोनच पर्यायी मार्ग आहेत. त्यातही अंधेरी सबवे हा स्थानकाच्याजवळ असल्यामुळे दुचाकीस्वार हा मार्ग निवडतात. तर पादचाऱ्यांना देखील हा मार्ग सोयीचा आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>> भाईंदर: धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमासाठी आदल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी

मात्र पावसाळ्यात अंधेरी सबवेमध्ये खूप पाणी साचते व मार्ग बंद करावा लागतो. यावर्षी गोखले पूल बंद असल्यामुळे अंधेरी सबवेवर ताण आहे. गोखले पुलाची एक बाजू पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. मात्र तरीही अंधेरी सबवे या पर्यायी मार्गाची यंदा कसोटी आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला व सुरक्षित राहील याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. पावसाळा तोंडावर आला असल्यामुळे पालिका प्रशासनाने अंधेरी सबवेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या सबवेमध्ये मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसवण्यात येणार आहे. त्याकरिता प्रशासनाने नुकत्याच निविदा मागवल्या आहेत.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 15:45 IST
Next Story
भाईंदर: धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमासाठी आदल्या दिवसापासूनच भाविकांची गर्दी
Exit mobile version