शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. यावेळी कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्याही देण्यात आल्या. त्यांच्या या धमक्यांना उत्तर देताना कंगनाने आपण मुंबईत येणार असून कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानच दिलं होतं. त्यानुसार कंगना बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाली. दरम्यान महापालिकेने मुंबईमधील कार्यालयावर केलेल्या कारवाईवर कंगनाने संताप व्यक्त केला आहे.

मुंबई महापालिकेकडून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. पालिकेकडून कंगनाच्या कार्यालयात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. भाजपा नेते राम कदम, प्रवीण दरेकर यांनी सूड भावनेने कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालिकेच्या कारवाईवर भाष्य केलं असून संशय निर्माण होण्यास आपण संधी देत असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी
कंगनाने मुंबईमधील घरी पोहोचताच एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे उद्या तुमचं गर्वहरण होईल असं कंगनाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
मुंबई विमानतळावरुन कंगना रणौत थेट आपल्या घरी पोहोचली आहे. पोलिसांच्या सुरक्षेत कंगना आपल्या घरी पोहोचली. तिच्या घराबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. याशिवाय कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेली नोटीस बेकायदेशीर असून बेकायदेशीरपणे त्यांनी परिसरात प्रवेश केल्याचा आरोप कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केला आहे. परिसरात कोणतंही काम सुरु नव्हतं असंही त्यांनी सांगितलं आहे.
मुंबई विमातळाबाहेर शिवसैनिक आंदोलन करत असून मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला अटक करण्याची मागणी केली जात आहे. तसंच कंगनाला मुंबंईत फिरु देणार नाही असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत केल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी धमकावल्याचा आरोप करताना कंगनाने मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं म्हटलं होतं. तिच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून अशी वक्तव्यं करणाऱ्यांना आपण अधिक महत्व देतोय असं मत व्यक्त केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी
मुंबई विमानतळावर एकीकडे रिपाइं कार्यकर्ते कंगनाच्या समर्थनार्थ घोषणा देत असून शिवसैनिक विरोधात आंदोलन करत आहेत. यामुळे विमानतळावर तणाव निर्माण झाला आहे. कंगना येणार असल्याने मुंबई विमानतळावर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. कंगनाला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
कंगना रणौत थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार असून तिच्या समर्थनार्थ रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेली रिपाइं आणि शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.
अभिनेत्री कंगना रणौत थोड्याच वेळात मुंबई विमानतळावर दाखल होणार असून त्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम तोडण्याची कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. महापालिकेने उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याने देण्यात आली स्थगिती. याप्रकरणी उद्या तीन वाजता सुनावणी होणार आहे.
Bombay High Court stays BMC’s demolition at Kangana Ranaut’s property, asks the civic body to file reply on actor’s petition pic.twitter.com/VaoeBSOnay— ANI (@ANI) September 9, 2020
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेने हातोड चालवल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळया प्रतिक्रिया येत आहेत. कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त
कंगनाच्या वकिलांनी महापालिकेकडून जुहू येथील कार्यालयावर करण्यात येत असलेल्या कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असुन सुनावणीला सुरुवात जाली आहे. उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने पालिकेकडून कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
अभिनेत्री कंगना रणौतच्या रक्षणासाठी आज मुंबई विमानतळावर टर्मिनल 2 वर पी 4 पार्किंग येथे रिपाइं कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केल्यानुसार कंगना रणौतच्या संरक्षणासाठी दुपारी 12.30 वाजता रिपाइं कार्यकर्ते विमानतळावर हजर राहणार आहेत. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष विवेक पवार यांनी ही माहिती दिली आहे.
कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयावर सुरु असलेली कारवाई थांबवण्यात आली आहे. कारवाईसाठी आणलेलं सर्व साहित्य घेऊन महापालिका कर्मचारी पुन्हा परतले आहेत. कंगनाच्या वकिलांनी कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली असून दुपारी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी होईपर्यंत कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
कंगनाने ट्विट करत आपल्या घऱात कोणतंही अनधिकृत बांधकाम नसल्याचं म्हटलं आहे. ट्विटमध्ये कंगनाने लिहिलं आहे की, “माझ्या घरात कोणतंही अनधिकृत बांधकाम नाही. तसंच सरकारने ३० सप्टेंबपर्यंत सर्व प्रकारच्या तोडक कारवाईवर बंदी आणली आहे. बॉलिवूडकरांनो फॅसिझम असं असतं”.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतवर सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. दुसरीकडे जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून कारवाई कऱण्यात येणार आहे. यावरुन भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत एकामागोमाग प्रश्न विचारले आहे. बात “हरामखोरीची”निघाली तर मग “डांबराने” लिहिले जाईल असे मुंबईकरांना बरेच आठवेल असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.
संपूर्ण बातमी वाचण्यासाठी
मुंबईचा पाकिस्तानव्याप्त काश्मीर असा उल्लेख केल्याने आधीच वाद निर्माण झालेल असताना कंगनाने पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार केला आहे. कंगनाने पालिकेच्या कारवाईवर टीका करणारं ट्विट करत लिहिलं आहे की, मी कधीच चुकीची नसते हे माझे विरोधक वारंवार सिद्द करत असतात. याच कारणाने माझी मुंबई आता पाकिस्तानव्याप्त काश्मीर झालं आहे.
मुंबई महापालिकेचे कर्मचारी कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करत आहेत. कंगनाने कारवाईचे फोटो ट्विट करत पाकिस्तान असं म्हटलं आहे. तसंच लोकशाहीचा मृत्यू असा हॅशटॅगही तिने दिला आहे.
कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कंगनाच्या कार्यालयामधील तळमजल्यावर असणारं अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. महापालिकेने कंगनाला मंगळवारी नोटीस बजावताना २४ तासांची मुदत दिली होती. पण कंगनाने उत्तर न दिल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली.
कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. यानिमित्तान कंगनाने ट्विट करत कारवाईवर टीका केली आहे. कंगनाने म्हटलं आहे की, “मणिकर्णिका फ़िल्म्समध्ये पहिला चित्रपट अयोध्येची घोषणा झाली होती. ही माझ्यासाठी इमारत नाही तर राम मंदिर आहे. आज इथे बाबर आला आहे. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर पुन्हा पाडलं जाईल, पण लक्षात ठेवा राम मंदिर पुन्हा उभं राहील..जय श्री राम”.
कंगना रणौत चंदीगढला विमानतळावर दाखल झाली असून थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करणार आहे. मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कंगनाच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतचा काही संबंध आहे का याची माहिती मुंबई पोलीस घेणार असल्याचं सांगितलं आहे. विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वक्तव्यावर कंगना रणौतने ट्विट केलं असून आपली ड्रग्ज टेस्ट करण्याचं आवाहन दिलं आहे. तसंच पुरावा सापडल्यास आपण आपली चूक मान्य करु असंही ती म्हणाली आहे.
कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मुंबई पोलीस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची मी आभारी आहे. कृपया माझी ड्रग्ज टेस्ट करा. माझे सर्व कॉल रेकॉर्ड तपासा. जर तुम्हाला ड्रग्ज तस्करांसोबत माझा कोणताही संबंध आढळला तर मी माझी चूक मान्य करेन आणि कायमची मुंबई सोडून देईन. तुमच्यासोबतच्या भेटीची वाट पाहतेय”.संपूर्ण बातमी वाचण्यासाठी
“मुंबई दर्शन घेण्यासाठी मी विमानतळाच्या दिशेने प्रवास करत आहे. यावेळी महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे गुंड माझ्या संपत्तीजवळ बेकायेदशीरपणे कारवाई करण्यास सज्ज झाले आहेत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मी रक्त देण्यासाठीही तयार आहे, हे काहीच नाही. सर्व घेऊ शकता पण माझं उत्साह वाढत राहील,” असं कंगनाने ट्विट करत म्हटलं आहे. कंगनाच्या जुहू येथील कार्यालयावर महापालिकेकडून कारवाई होण्याची शक्यता असून त्यानिमित्ताने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचा फोटो ट्विट करत कंगनाने टीका केली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी देणारा फोन करण्यात आला. कंगनासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकी देणारा फोन आल्याची माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
कंगना रणौतला करणी सेनेने पाठिंबा दर्शवलेला आहे. मुंबई विमानतळापासून ते तिच्या घरापर्यंत सुरक्षित नेण्यासाठी आपण तिला संरक्षण देऊ असं करणी सेनेने जाहीर केलं आहे.
वाचा संपूर्ण बातमी
कंगना रणौतला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. कंगनाला मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कंगनाला ही सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे मुंबई विमानतळावर कंगनाच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात असणार आहे.
वाचा संपूर्ण बातमी
कंगना रणौत मुंबईसाठी रवाना झाली असून चंदिगढ विमानतळाच्या दिशेने प्रवास सुरु आहे. यावेळी कंगनाने हमीरपूर जिल्ह्यातील कोठी परसिरात थांबून मंदिरात दर्शन घेतलं. यावेळी तिची बहिण रंगोलीदेखील तिच्यासोबत आहे. चंदिगढ येथून कंगना मुंबईसाठी रवाना होणार आहे.
कंगनाने मुंबईला येण्यासाठी प्रवास सुरु केला असून चंदीगढच्या दिशेने रवाना झाली आहे. चंदीगढ येथून कंगना विमानाने मुंबईसाठी प्रवास सुरु करणार आहे. यादरम्यान कंगनाने अजून एक ट्विट केलं असून मुंबई आपलं घर असल्याचं म्हटलं आहे. तसंच महाराष्ट्राने आपल्याला सर्व काही दिलं आहे हे मान्य आहे, पण आपणही महाराष्ट्राला अशी एक मुलगी दिली आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर महिलांच्या सन्मान आणि अस्मितेसाठी आपलं रक्त देऊ शकते असं म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच आता कंगनाची मुख्य भूमिका असलेला एक चित्रपट करण्यास सिनेमॅटोग्राफर पीसी श्रीराम यांनी नकार दिला आहे. पीसी श्रीराम यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. सविस्तर वाचा
कंगना आज मुंबई विमातळावर दाखल होणार असून यावेळी आरपीआय तिला संरक्षण देईल अशी घोषणा रिपाइचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे. ४ सप्टेंबरला रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. कंगनाला RPI संरक्षण देईल”.
कंगना रणौत आज मुंबईत दाखल होणार असून तिने प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याआधी तिने ट्विट केलं असून ‘जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली आहे. आपल्याला महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जाणं खेदाची बाब असून आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या मार्गावर चालणार असून ना घाबरणार, ना माघार घेणार असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कंगना रणौतच्या पहिल्या करोना चाचणीचा अहवाल योग्य न आल्याने पुन्हा एकदा चाचणी करण्यात आली होती. यावेळी तिचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याची माहिती हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी देवेंदर शर्मा यांनी दिली आहे.
कंगना रणौत आज मुंबईत येणार असून हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून चंदीगढसाठी रवाना झाली आहे. चंदीगढ येथून कंगना मुंबईसाठी प्रवास सुरु करणार आहे.