मुंबई : मुंबईतील विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याचे धमकी सत्र सुरूच असून मंगळवारीही एक्स (ट्वीटर) हँडलद्वारे १० विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती. याप्रकरणी सहार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी दाखल केलेला हा १० गुन्हा आहे. या प्रकरणांमध्ये गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे.

सहार पोलिसांनी अनोळखी ट्वीटर खातेधारकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत मंगळवारी एक्सद्वारे धमकी देण्यात आली. तपासणीत त्यात काहीच आढळले नाही. गेल्या १० दिवसांत मुंबई पोलिसांनी १० गुन्हे दाखल केले असून विमानात बॉम्ब असल्याचे संदेश अथवा ई-मेल करण्यात आले होते. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही समांतर तपास करीत आहे. गेल्या आठवड्याभरापासून धमक्यांचे सत्र सुरू असून सर्व विमानांमधील प्रवाशांची आणि सामानाची बारकाईने तपासणी करण्यात आली, परंतु त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. आवश्यक तपासणीनंतर, धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा…स्वीकृत झालेल्या २५० झोपु योजनांतील विकासकांची हकालपट्टी

देशातील विविध एअरलाइन्सवर बॉम्बची माहिती रविवारी मिळाली होती. त्यात यूके १०६ (सिंगापूर – मुंबई) आणि यूके १०७ (मुंबई – सिंगापूर) यासह विस्तारा एअरलाइन्सला त्यांच्या सहा विमानांसाठी धमक्या मिळाल्या. अकासा एअरला देखील क्यूपी १०२ (अहमदाबाद – मुंबई), क्यूपी १३८५ (मुंबई – बागडोगरा), क्यूपी १५१९ (कोची – मुंबई) आणि क्यूपी १५२६ (लखनौ – मुंबई) यासह अनेक विमानांबाबत सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. इंडिगो एअरलाइन्सने ६ ई ५८ (जेद्दा – मुंबई) आणि ६ ई १७ (मुंबई – इस्तंबूल) सह सहा विमानांवर सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. प्रत्येक विमानांची व प्रवशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. तपासणीत सर्व धमक्या अथवा संदेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच उदयपूर – मुंबई विमानामध्ये बॉम्ब असल्याचे टिश्यू पेपरवर लिहिण्यात आले होते. तो संदेशही खोटा असल्याचे निष्पन्न झाले होते.

हेही वाचा…निवडणूक काळात तातडीच्या जप्तीचे आयुक्तांचे आदेश

सहार पोलिसांनी गेल्या आठवड्यात छत्तीसगडमधून एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला पकडले होते. एका व्यक्तीच्या नावाने एक्स या समाज माध्यमावर खाते तयार करून धमकीचा संदेश पोस्ट केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्या व्यक्तीसोबतच्या जून्या वादावरून त्याने त्याला अडवकण्यासाठी हा प्रकार केला होता.

Story img Loader