मुंबई : पाच महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याच्या आरोप असलेल्याला उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला. आरोपीने एकापेक्षा अधिक महिलांशी लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचे दाखवणारे पुरेसे उपलब्ध आहेत. त्यामुळे, त्याला अटकेपासून दिलासा देण्याचे ठोस कारण दिसून येत नाही, असे सकृतदर्शनी निरीक्षण नोंदवून न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या एकलपीठाने याचिकाकर्त्याची अटकपूर्व जामीन देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता, आरोपीने केवळ एकापेक्षा अधिक लग्नच केलेली नाही, तर त्याला दोन मुले असल्याचेही उघड झाले आहे. मुलांच्या जन्मदाखल्यानुसार, मुलांच्या माता वेगळ्या असल्या तरी वडील एकच म्हणजे याचिकाकर्ता असल्याची बाबही न्यायालयाने त्याला दिलासा नाकारताना अधोरेखीत केली. याचिकाकर्त्याने तक्रारदार महिलेची फसवणूक केल्याचे पुराव्यावरून सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने त्याची फेटाळताना नमूद केले.

हेही वाचा >>> ख्वाजा युनुस कोठडी मृत्यू प्रकरणात माफीचा साक्षीदार होऊ द्या; सचिन वाझे यांची विशेष न्यायालयाकडे मागणी

Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली
Supreme Court orders Baba Ramdev to appear before court for refusing to respond to contempt notice issued against misleading advertisements of Patanjali Ayurveda
रामदेवबाबा यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश; अवमान नोटिसीला उत्तर देणे टाळले
Order for the immediate release of the accused who was in jail for 19 years and who was a minor at the time of the crime Mumbai news
१९ वर्षे कारागृहात असलेला आरोपी गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचे उघड; आरोपीची तातडीने सुटका करण्याचे आदेश

तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून गेल्यावर्षी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अटकपूर्व जामीन देण्याच्या मागणीसाठी याचिकाकर्ता शांतीलाल खरात याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपीची तक्रारदार महिलेशी एप्रिल २०२२ मध्ये विवाह संकेतस्थळावर ओळख झाली होती. त्यानंतर दोनच महिन्यांनी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर आरोपीने तक्रारदाराकडे आर्थिक मदत मागितली आणि तिने त्याला सात लाख रुपयांसह दागिनेही दिले. ते गहाण ठेवून त्याने ३२ लाखांचे कर्ज घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढे आरोपीचे सहकाऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा तक्रारदार महिलेला संशय आला आणि ती जानेवारी २०२३ मध्ये घर सोडून माहेरी रहायला गेली. आरोपीबाबत चौकशी केली असता त्याचे याआधी चार वेळा लग्न झाल्याचे, तसेच पहिल्या पत्नीचे निधन झाल्याची माहिती तक्रारदार महिलेला मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच तक्रारदार महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात फसवणूक, द्विभार्या कायद्यासह भारतीय दंड संहितेच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर फक्त तक्रारदार महिलेशी विवाह केल्याचा दावा आरोपीच्या वतीने वकील डॉ. समर्थ करमरकर यांनी केला. दुसरीकडे, आरोपीने इतर महिलांशी विवाह केल्याचे पुरावे न्यायालयात सादर करून सरकारी वकिलांनी याचिकाकर्त्याच्या याचिकेला विरोध केला. न्यायालयाने, पोलिसांचे म्हणणे मान्य करून याचिकाकर्त्याला अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.