मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचेही आदेश

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वैद्यकीय जामिनासाठी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. त्याचवेळी मलिक यांच्या वैद्यकीय स्थितीचा दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचेही आदेश दिले.

supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

मलिक हे त्यांच्या पसंतीनुसार खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे अनेक कैद्यांना अशी सुविधा मिळत नाही याचाही विचार करायला हवा, असेही न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना म्हटले. तसेच वैद्यकीय गरज भासल्यास मलिक हे सुट्टीकालीन न्यायालयाकडे दाद मागू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मलिक यांनी नियमित जामीनाचीही मागणी केली आहे. त्यावरील सुनावणी न्यायालयाने ६ जानेवारी रोजी ठेवली आहे.

विशेष न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्यावर मलिक यांनी वैद्यकीय जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. प्रकरणातील मुख्य साक्षीदार मुनिरा प्लम्बरच्या जबाबात त्रुटी आढळल्यावरही विशेष न्यायालयाने आपल्याला जामीन नाकारल्याचा दावा मलिक यांनी उच्च न्यायालयातील याचिकेत केला आहे. असे करून विशेष न्यायालयाने मलिक यांच्या गंभीर वैद्यकीय स्थितीकडे दुर्लक्ष केले आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. मलिक हे सध्या कुर्ला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, मलिक हे खरोखर गंभीर आजाराने त्रस्त आहेत, तर त्यांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या मागणीला त्यांनी स्वत:हून परवानगी का दिली नाही ? असा प्रश्न विशेष न्यायालयाने त्यांना जामीन नाकारताना उपस्थित केला होता. तसेच तपशीलवार वैद्यकीय अहवालांच्या अनुपस्थितीत आणि वैद्यकीय मंडळाने मलिक यांची तपासणी न केल्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मलिक यांची जामिनाची मागणी फेटाळताना स्पष्ट केले होते.