Bombay HC : आईची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाण्याचं विकृत कृत्य करणाऱ्या मुलाची फाशी मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay HC ) कायम ठेवली आहे. कोल्हापूर येथील हे प्रकरण आहे. मुलाने आईची हत्या करुन तिच्या मृतदेहाच्या अवयवयांचे काही भाग शिजवून खाल्ले होते. मुलाने केलेलं हे कृत्य अमानावी आणि विकृत आहे असं निरीक्षणही न्यायालयाने ( Bombay HC ) नोंदवलं आहे आणि त्याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापूर येथे राहणारा आरोपी सुनील कोंचीकोरवी याने त्याच्या आईची हत्या दारुच्या पैशांसाठी केली होती. त्यानंतर त्याने आईच्या मृतदेहाचे अवयव शिजवून खाल्ले होते. कोल्हापूर येथील माकडवाला परिसरात २८ ऑगस्ट २०१७ ला ही भयंकर घटना घडली होती. या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने ८ जुलै २०२१ ला या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने हीच शिक्षा कायम ठेवली आहे. ही घटना दुर्मिळातली दुर्मिळ आहे तसंच आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे आणि आरोपी सुधारण्याची काहीही शक्यता नाही. असंही मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay HC ) म्हटलं आहे आणि त्याची शिक्षा कायम ठेवली आहे.

loksatta editorial on fake court set up in ahmedabad zws
अग्रलेख : भामटे आणि तोतये…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
supreme court overturns nclat judgment on byju s bcci settlement
विश्लेषण : ‘बैजूज’पुढील अडचणींत वाढ?
notorious chhota rajan granted bail by bombay high court
जया शेट्टी हत्या प्रकरण;कुख्यात छोटा राजनला उच्च न्यायालयाकडून जामीन;व्यावसायिक अन्य प्रलंबित खटल्यांमुळे तुरुंगातच मुक्काम
cold-headed murder of girlfriend and cinestyle misdirection of the police
प्रेयसीची थंड डोक्याने हत्या अन् पोलिसांची सिनेस्टाईल दिशाभूल
woman crushed to death under a car by tourists due to a dispute over rent
पर्यटकांकडून महिलेची गाडीखाली चिरडून हत्या; रायगड जिल्ह्यातील घटना, आठपैकी तीन आरोपींना अटक
Vikas Yadav
Vikash Yadav: पन्नूनच्या हत्येच्या कटात भारत सरकारच्या कर्मचाऱ्याचा सहभाग- अमेरिकेचा आरोप; दिल्लीत यादवला अटक का करण्यात आली होती?
father killed son for demanding money to drink liquor
मुलाचा खून करुन बाप मृतदेहाजवळच झोपला…

हे पण वाचा- दीड लाखांचा iPhone ऑनलाईन मागवला, डिलिव्हरी मॅन येताच पैसे देण्याऐवजी त्याचाच जीव घेतला

मुंबई उच्च न्यायायलाने काय म्हटलंय?

न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीच्या वेळी आरोपी सुनील हा पुण्यातल्या येरवडा तुरुंगातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होता. सदर प्रकरण हे नरभक्षणाचं प्रकरण आहे. आरोपीने आईची हत्या केल्यानंतर तिचा मेंदू, यकृत आणि इतर अवय शिजवून खाल्ले होते. अत्यंत दुर्मिळातलं दुर्मिळ असं हे प्रकरण आहे. आरोपी सुधारण्याची काही शक्यता नाही त्यामुळे त्याची फाशी कायम ठेवत आहोत असं मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay HC ) म्हटलं आहे.

हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं होतं?

आरोपी सुनील कोंचीकोरवी याची आई फुगे आणि कंगवे विकून उदरनिर्वाह करत होती. तिला राजू आणि सुनील अशी दोन मुलं होती. सुनील हा लहान मुलगा आहे. सुनीलला दारुचं व्यसन लागलं. हत्येची घटना घडली तेव्हा तो रात्री १० वाजता घरी आला होता. त्याने आईकडे पैशांची मागणी केली. आईने त्याला पैसे देण्यास नकार दिला. ज्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी सुनीलने त्याच्या आईवर चाकू हल्ला केला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाच लचके तोडले आणि काही अवयव शिजवून खाल्ले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.