महाराष्ट्र सिटी टॅक्सी अधिनियमाअंतर्गत अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असलेला शहरात वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. अ‍ॅप आधारित सगळ्या टॅक्सी कंपन्या परवान्याशिवाय चालवल्या जात असल्याने उच्च न्यायालयाकडून याबाबत विचारणा करण्यात आली आहे. न्यायालयाने याप्रकरणी दखल घेत कॅब अ‍ॅग्रीगेटरना १६ मार्च पर्यंत राज्य सरकारसमोर मोटर वाहन कायद्यांतर्गत त्यांच्या टॅक्सी चालवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत.

अशा पद्धतीने या सेवांना परवानगी दिली जाऊ शकत नाही. पण राज्याचे नियम अद्याप नसल्याने केंद्रीय नियमांप्रमाणे या कंपन्यांनी परवान्यासाठी १६ मार्चपर्यंत संबंधित यंत्रणेकडे अर्ज करावा. त्यावर १० दिवसांत निर्णय घावा. निर्णय विरोधात गेल्यास अपील करण्याची मुभा या कंपन्यांकडे असणार आहे. पण तेही फेटाळले गेल्यास सेवा देत येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Sudden transfer of municipal officials has affected the pre-monsoon work
महापालिका अधिकाऱ्यांच्या अचानक बदलीमुळे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना फटका
supreme court
पुरवणी आरोपपत्रांवरून ईडीची खरडपट्टी; जामीन मिळण्याच्या अधिकाराचे हनन- सर्वोच्च न्यायालय

प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींच्या तक्रारीसाठी उबरने तक्रार निवारण व्यासपीठ उपलब्ध केले नसल्याविरोधात अ‍ॅड्. सॅविना क्रॅस्टो यांनी जनहित याचिका केली होती. उबरकडून ग्राहकांना तक्रार करण्यासाठी ईमेल किंवा दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला गेलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना तक्रार करणे कठीण होऊ बसते, असा दावा सॅविना यांनी केला होता. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर उबरने प्रवास करणाऱ्यांना कशा अडचणी येतात आणि त्यांना तक्रारीसाठी काहीच व्यासपीठ उपलब्ध नसल्याचे याचिकाकर्तीने न्यायालयाला सांगितले होते. उबर इंडियाच्या वकिलाने मात्र तक्रार निवारणासाठी यंत्रणा उपलब्ध केल्याचा दावा केला होता.

सुनावणीच्या वेळी महाराष्ट्र सिटी टॅक्सी अधिनियमाअंतर्गत अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना शहरात वाहन चालवण्यासाठी बंधनकारक असलेला परवाना तुमच्याकडे आहे का, अशी विचारणा न्यायालयाने कंपनीकडे केली होती. त्याचवेळी अ‍ॅपआधारित टॅक्सी सेवांसाठीच्या २०१७ च्या नियमांना आव्हान देण्यात आल्याने अशा सेवांवर कारवाई करणार नसल्याची हमी राज्य सरकार पाच वर्षे कायम कशी ठेवू शकते, याबाबतही न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले होते.

दरम्यान, टॅक्सी कंपन्या परवान्याशिवाय चालवल्या जाऊ शकत नसल्याचे म्हणत आता पुन्हा न्यायालयाने याप्रकरणी दखल घेतली आहे. या पद्धतीने या सेवांना परवानगी दिली जाऊ शकत नाही. नियमांप्रमाणे या कंपन्यांनी परवान्यासाठी १६ मार्चपर्यंत राज्य सरकारसमोर मोटर वाहन कायद्यांतर्गत त्यांच्या टॅक्सी चालवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करण्याची सूचना न्यायालयाने दिली आहे.

महाराष्ट्रात परवान्यासाठी अर्ज करण्याकरिता कोणतेही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. अन्य अ‍ॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांनीही शहरात वाहन चालवण्यासाठी आवश्यक परवाना घेतला नसल्याचा दावा उबर इंडियाने केला होता. आजपर्यंत राज्य सरकारने मोटार वाहन कायद्यांतर्गत कोणतेही नियम अधिकृतपणे प्रसिद्ध केलेले नाहीत. महाराष्ट्रात परवान्यासाठी अर्ज करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया दर्शवणारे कोणतेही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. परवाना मंजूर करण्याच्या अटींबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचाही दावा उबर इंडियाने केला होता.