scorecardresearch

“आम्ही कारवाईसंबंधी हमी देऊ शकत नाही,” राणे प्रकरणात ठाकरे सरकारने मांडली भूमिका; हायकोर्टाने दिले आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. धुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नारायण राणेंनी पोलिसांना कठोर कारवाईसह आरोपपत्र दाखल करण्यापासून मज्जाव करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. यानंतर कोर्टाने नारायण राणे यांना दोन आठवडे अटकेपासून अंतरिम दिलासा दिला असून तसे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारने नारायण राणेंविरोधात कारवाई न करण्याची हमी देण्यास कोर्टात नकार दिला. यानंतर हायकोर्टाने नारायण राणे यांना दोन आठवडे अटकेपासून अंतरिम दिलासा देत तसे आदेश दिले.

महाराष्ट्राचा समृद्ध राजकीय वारसा जपा! ; सद्य:स्थितीबाबत उच्च न्यायालयाचे खडेबोल

दरम्यान गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने राजकीय विचारधारा आणि समजुतींमधील मतभेद हे राजकीय विरोधकांमधील सौहार्दपूर्ण संबंधांच्या आड येऊ नयेत. महाराष्ट्र हे समृद्ध राजकीय वारसा लाभलेले राज्य आहे; तो जपा, असे बोल सत्ताधारी आणि विरोधकांना सुनावले होते.

गुन्ह्यविरोधात नारायण राणे उच्च न्यायालयात

कोर्टाने यावेळी राणे यांनाही पुढाकार घेऊन झाले गेले विसरण्याचा सल्ला दिला होता. राणे हे स्वत: जबाबदार पदावर आहेत. त्यामुळे दुसऱ्या जबाबदार पदावरील व्यक्तीविरुद्ध आदराने बोललं पाहिजे असंही म्हटलं होतं.

काय आहे प्रकरण ?

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात रायगड येथे पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राणे यांच्याविरोधात राज्यातील विविध जिल्ह्यांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. धुळे पोलिसांनीही २४ ऑगस्टला राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. धुळे पोलिसांनी नुकतीच राणे यांना नोटीस बजावून आरोपपत्र दाखल केलं जाणार असल्याचे कळवलं होतं.

अ‍ॅड्. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत राणे यांनी हायकोर्टात धाव घेऊन धुळे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. आपल्याविरोधातील आरोप हे राजकीयदृष्टय़ा प्रेरित असल्याचा दावाही राणे यांनी याचिकेत केला होता. त्याचवेळी आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल किंवा कोणत्याही विशिष्ट वर्गाच्या किंवा गटाच्या विरोधात द्वेषपूर्ण हिंसाचार किंवा संताप वाढवण्याचा कोणताही हेतू नव्हता. मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचाही आपला हेतू नव्हता, असा दावाही राणे यांनी केला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bombay high court maharashtra police objectionable language union minister narayan rane cm uddhav thackeray dhule sgy

ताज्या बातम्या