Premium

नांदेड, छ्त्रपती संभाजीनगर न्यायालयाकडून स्वतःहून दखल; नेमके काय घडले याची माहिती सादर करण्याचे सरकारला आदेश

नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात व त्यानंतर छ्त्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरू असल्याचे उघड झाले आहे.

bombay high court notice about death in government hospitals
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : नांदेड व त्यानंतर छ्त्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या मृत्युसत्राची उच्च न्यायलयाने बुधवारी स्वतःहून दखल दखल घेतली. तसेच, या संपूर्ण प्रकरणाची, या रुग्णालयांत किती तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत यासह अन्य प्राथमिक माहिती सादर करण्याचे आदेश महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नांदेड रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबतच्या गैरवर्तणुकीविरोधात वैद्यकीय क्षेत्रात संताप

मनुष्यबळाची कमतरता, औषधांची टंचाई, अशा कारणांनी मृत्यू होत असतील तर अशी कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत, असेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला बजावले आहे. त्यावर, नेमके काय आणि कसे घडले ? या साऱ्याची माहिती घेऊन गुरुवारी सादर करण्याची हमी सराफ यांनी न्यायालयाला दिली.

हेही वाचा >>> मुंबईत पदपथावरील मार्ग प्रतिबंधक अपंगांसाठी ठरत आहेत अडथळा, उच्च न्यायालयाकडून दखल

आधी नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात व त्यानंतर छ्त्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरू असल्याचे उघड झाले आहे. शासकीय रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि सुविधांचा अभाव यावर मृत्युसत्रामुळे अधोरेखित झाले आहे. न्यायालयानेही या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी आणि आवश्यक ते आदेश देण्याची मागणी वकील मोहित खन्ना यांनी एका अर्जाद्वारे सकाळच्या  सत्रात मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे केली होती. न्यायालयाने या अर्जाची दखल घेऊन खन्ना यांना याप्रकरणी याचिका करण्यास सांगितले होते. ही याचिकाही न्यायालय गुरुवारी ऐकणार आहे. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस होते. त्यानंतर आणखी ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर छ्त्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे मंगळवारी उघड झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bombay high court notice about death in nanded and nagpur government hospitals zws

First published on: 04-10-2023 at 16:20 IST
Next Story
नांदेड रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबतच्या गैरवर्तणुकीविरोधात वैद्यकीय क्षेत्रात संताप