मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी मागण्याचा आणि खरी शिवसेना कोणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्याचा काहीही संबंध नाही, असे उच्च न्यायालयाने शुक्रवारी नमूद केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे दादर येथील आमदार सदा सरवणकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेल्या याचिकेविरोधातील हस्तक्षेप याचिका फेटाळली. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरी शिवसेना कोणाची हा मुद्दा केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठीकडे प्रलंबित आहे. असे असताना ठाकरे गटाची शिवाजी पार्कवरील मेळाव्याची मागणी मान्य केल्यास त्यांना तीच खरी शिवसेना असा समज होईल, असा दावाही सरवणकर यांनी केला होता. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासमोरील प्रकरणांची माहिती ठाकरे गटाने लपवल्याचा दावा सरवणकर यांच्यावतीने वकील जनक द्वारकादास यांनी केला. तसेच खरी शिवसेना कोणाची हे निश्चित होईपर्यंत ठाकरे गटाच्या याचिकेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

त्यावर खरी शिवसेना कोणाची याबाबत आपण काहीही भाष्य करणार नाही. आपल्यासमोर याचिकेचा आणि निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay high court reject eknath shinde group sada sarvankar interventions application zws
First published on: 24-09-2022 at 06:00 IST