अक्षय मांडवकर

राष्ट्रीय उद्यानातून ‘टीबीएम’द्वारे भुयारी मार्ग काढणार; उद्यान प्रशासनाची मान्यता

nagpur, Man Stabbed , Asking Couple to Move Vehicle, Blocking Road, nagpur crime news, nagpur Man Stabbed, Man Stabbed nagpur, marathi news, nagpur news,
नागपूर : प्रेयसीसमोर अपमान केल्यामुळे चाकू भोसकला….
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

बोरिवली आणि ठाणे यादरम्यानचे अंतर किमान ४० मिनिटांनी कमी करणाऱ्या सहापदरी मार्गाच्या आखणीतील महत्त्वाचा अडथळा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यासाठी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भुयारी मार्ग काढावा लागणार आहे. हा भुयारी मार्ग ‘टनल बोअरिंग मशीन’च्या (टीबीएम) मदतीने खोदण्यावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि राष्ट्रीय उद्यान प्रशासनात एकमत झाले असून आता हा प्रस्ताव नागपूर येथील वनविभागाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

बोरिवली-ठाणेदरम्यानचा हा राष्ट्रीय उद्यानातून जाणारा ११ किमीचा सहापदरी मार्ग आहे. यामुळे बोरिवली-ठाणे हा सध्या एक तासाचा असलेला प्रवास २० मिनिटांवर येणार आहे. हा भुयारी मार्ग बोरिवलीच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एकता नगर येथून सुरू होऊन ठाण्याच्या टिकुजिनी-वाडी परिसरातून बाहेर पडेल. या प्रकल्पासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गाचे भुयारीकरण कसे करायचे याबाबत ‘एमएसआरडीसी’ने बंगळुरू येथील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ रॉक मॅकेनिझम’ या संस्थेकडून अहवाल मागवला होता. त्यात स्फोटके वापरून भुयारीकरण करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र यामुळे उद्यानातील जैवविविधतेला बाधा पोहोचेल असे उद्यान प्रशासनाचे म्हणणे होते. त्यामुळे आता ‘टीबीएम’ने भुयारीकरण करण्याचा महागडा पर्याय एमएसआरडीसीने स्वीकारला आहे. राष्ट्रीय उद्यान प्रशासनानेही अनुकूलता दर्शवली आहे. गोरेगाव-मुलुंड भुयारी जोडरस्त्याला उद्यान प्रशासनाने नुकतीच मान्यता दिली. त्याला समांतर असलेल्या ‘एमएसआरडीसी’च्या भुयारी मार्गालाही परवानगी देण्यात आली आहे. तो नागपूरच्या वन विभागाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला असून त्यानंतर त्याला केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी लागणार आहे. ‘टीबीएम’ वापरल्याने या प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

वनक्षेत्रामधील जैवविविधता लक्षात घेता स्फोटकाद्वारे खणण्यात येणाऱ्या बोरिवली-ठाणे भुयारी मार्गाचा ‘एमएसआरडीसी’चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. मात्र आता त्यांनी टीबीएम यंत्राच्या आधारे भुयारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव आम्ही स्वीकारला असून तो पुढील परवानगीसाठी नागपूरला वन विभागाच्या मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

– अन्वर अहमद, मुख्य वनसंरक्षक, राष्ट्रीय उद्यान