प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

साकीनाका येथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

साकीनाका येथे एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मात्र तिचा प्रियकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
साकीनाका येथील जरीमरी चाळीमध्ये बाबू सेलवन (३८) आणि रिबा (३५) हे दाम्पत्य वास्तव्यास होते. शुक्रवारी या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापलेल्या रिबाने आपल्या प्रियकराच्या मदतीने बाबूचा गळा आवळून खून केला. झोपेतच बाबूची हत्या झाली. शनिवारी सकाळी शिक्षिका असलेली रिबा शाळेत निघून गेली. वडील बराच वेळ न उठल्यामुळे बाबूचा मुलगा त्याला उठविण्यास गेला. त्यावेळी बाबूच्या मानेवर आवळल्याच्या खूणा त्याला दिसल्या. त्याने तात्काळ रिबाशी संपर्क साधला. रिबाही धावत घरी आली आणि त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी रिबाची चौकशी केली असता तिने आपण प्रियकराच्या मदतीने बाबूचा खून केल्याचे कबूल केले. पोलिसांनी रिबाला अटक करून न्यायालयात हजर केले. तिला २४ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Boy friend help to murder husband

ताज्या बातम्या