boy from ghatkopar made up a false story of his own kidnapping mumbai print news zws 70 | Loksatta

मुंबई : मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

मुलाला विश्वासात घेतल्यानंतर हा बनाव असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मुंबई : मुलाने रचला स्वतःच्या अपहरणाचा बनाव
प्रतिनिधिक छायाचित्र

शाळेच्या अभ्यासातून काही दिवस सुटका घेण्यासाठी घाटकोपरमधील एका ११ वर्षांच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार घडला आहे. मुलाच्या या कृत्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांची मोठी दमछाक झाली. मात्र मुलाला विश्वासात घेतल्यानंतर हा बनाव असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुले पळणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर पसरवल्या जात आहेत. समाजमाध्यमांवरील याबाबतचे व्हिडिओ चित्रण पाहून घाटकोपरच्या अशोक नगर परिसरात राहणाऱ्या या ११ वर्षांच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. काही दिवसांपूर्वीच या मुलाची परीक्षा संपली होती. या परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाल्याने त्याला त्याचे शिक्षक ओरडले होते. त्यामुळे शाळेत जाण्यास तो टाळाटाळ करीत होता. याचदरम्यान त्याला अपहरणाची कल्पना सुचली.

बुधवारी सकाळी शाळेत जात असताना आपल्याला दोघांनी रिक्षात कोंबले. त्यानंतर दोघांनी माझे तोंड दाबले, मात्र मी त्यांच्याशी झटापट करून पळ काढल्याची बतावणी त्याने त्याच्या पालकांना केली. घाबरलेल्या पालकांनी तत्काळ शाळा गाठली. शाळेतील शिक्षकांना हा प्रकार सांगितल्यानंतर या सर्वांनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलाने वर्णन केलेल्या रिक्षाचा पोलिसांनी शोध सुरू केला. तसेच घटना घडलेल्या मार्गावरील सर्व सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण ताब्यात घेण्यात आले. मात्र पोलिसांना काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली असता तो वेगवेगळ्या रस्त्यांची नावे सांगू लागला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला विश्वासात घेतल्यानंतर आपणच हा बनाव केल्याची कबुली त्याने दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
एरंगळ समुद्रकिनाऱ्याजवळील स्मशानभूमी पुन्हा बांधून द्या; उच्च न्यायालयाचे उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

संबंधित बातम्या

मुंबईः उपचाराच्या निमित्ताने वृद्धाची १० लाखांची फसवणूक; तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
विशाल कारियाच्या आर्थिक प्रगतीवर गुन्हे शाखेची नजर
मुंबईमधील जोडपं Live Stream करत होतं Sex Video; गायकाच्या तक्रारीनंतर पोलीस तपास सुरु
ईडी अधिकाऱ्यांसोबत खंडणी रॅकेट चालवणाऱ्या जितेंद्र नवलानींवर गुन्हा दाखल; संजय राऊतांनी केले होते आरोप
मुंबई: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला मारहाण करणारे सात जण अटकेत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे : मनसे अंतर्गत गटबाजी उफाळली; वसंत मोरेंच्या आरोपानंतर पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक
महाराष्ट्रातील वाहनांवर बेळगावात हल्ला: अजित पवार संतापून म्हणाले, “‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारने…”
उर्वशी रौतेलाच्या घरी लगीनघाई, अभिनेत्री रंगली हळदीच्या रंगात
“तर मी…” ऐतिहासिक चित्रपटातील भूमिकांविषयी अक्षय कुमारने दिलं होतं स्पष्टीकरण
मुंबईः उपचाराच्या निमित्ताने वृद्धाची १० लाखांची फसवणूक; तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल