मुलाचे २१ आणि मुलीचे १८ वय झाल्यानंतर पालकांना त्यांच्या विवाहाच्या चिंतेने ग्रासते. पालकांना या चिंतेतून मुक्त करण्यासाठी लोकसत्ता जीवनसाथी आणि अनुरुप विवाहसंस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवार, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८.३० या वेळेत श्री साई शुभ कार्यालय, श्रीखंडे वाडी, पद्मश्री हॉस्पिटलमागे, मानपाडा रोड, डोंबिवली (पू.) येथे ‘लग्न मुला-मुलींची चिंता पालकांची!’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसत्ता जीवनसाथी प्रस्तूत आणि अनुरुप परिवार आयोजित या कार्यक्रमात मुला-मुलींचे लग्नाचे वय झाल्यानंतर त्यांचे लग्न ठरेपर्यंत येणाऱ्या विविध अडचणींना तोंड कसे द्यायचे? मुला-मुलींशी वाद न घालता संवाद कसा साधावा? या प्रक्रियेत मुला-मुलींचा सहभाग कसा वाढवावा या विषयी अनुरुप परिवाराचे गौरी आणि महेंद्र कानिटकर पालक वर्गाशी संवाद साधणार
आहेत.
हा कार्यक्रम रविप्रकाश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी http://www.anuroopwiwaha.com  या संकेतस्थळावर भेट द्यावी.