scorecardresearch

मुंबई : मानखुर्दमध्ये १६ वर्षीय मुलाची हत्या, ४ आरोपींना अटक, शौचालयात आढळला होता मृतदेह

मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंड परिसरातील एका बंद शौचालयात पोलिसांना १६ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

मुंबई : मानखुर्दमध्ये १६ वर्षीय मुलाची हत्या, ४ आरोपींना अटक, शौचालयात आढळला होता मृतदेह
प्रातिनिधिक

मुंबई : मानखुर्दच्या लल्लूभाई कम्पाउंड परिसरातील एका बंद शौचालयात गुरुवारी दुपारी मानखुर्द पोलिसांना एका १६ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला होता. मानखुर्द पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून हत्या करणाऱ्या चार आरोपींना अटक केली असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

लल्लूभाई कम्पाउंड परिसरातील बंद शौचालयात एक मृतदेह असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना गुरुवारी दुपारी मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. तपासात हा मृतदेह परिसरातच राहणाऱ्या तय्यब खान (वय १६) याचा असल्याचे उघडकीस आले. अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून तय्यबची हत्या केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

हेही वाचा – एक कोटी प्रवाशांनी केला गारेगार प्रवास; मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढला

काही दिवसांपूर्वी परिसरातच राहणाऱ्या तरुणांसोबत तय्यबचा वाद झाला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी गुरुवारी रात्री या तरुणांना ताब्यात घेतले. तरुणांची चौकशी केली असता त्यांनी तय्यबची हत्या केल्याची कबुली दिली. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणामुळे तय्यबची हत्या केल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. चारही आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-01-2023 at 16:25 IST

संबंधित बातम्या