scorecardresearch

Video: मुलींना पाहून छेड काढण्यासाठी मानखुर्द उड्डाणपुलावर धावत्या कारमध्ये मुलाचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ व्हायरल

मुंबईतल्या तरूणाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे

Video: मुलींना पाहून छेड काढण्यासाठी मानखुर्द उड्डाणपुलावर धावत्या कारमध्ये मुलाचा जीवघेणा स्टंट, व्हिडिओ व्हायरल
वाचा काय घडली ही घटना? फोटो सौजन्य-राज माजी, ट्विटर अकाऊंट

मुंबईतल्या मानखुर्द या ठिकाणी उड्डाण पुलावर ओला कारमध्ये बसलेल्या एका मुलाचा जीवघेणा स्टंट कॅमेरात कैद झाला आहे. मुलींना पाहून त्यांची छेड काढत हा मुलगा धावत्या कारच्या बाहेर येऊन मुलींना बोलवत होता. विविध इशारे करत होता. त्यावेळीच हा व्हिडिओ शूट करण्यात आला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते राज माजी यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

राज माजी यांनी काय म्हटलं आहे?

ओला कॅबमधून हा मुलगा किती जीवघेणा स्टंट करतो आहे पाहा. तो आपल्या कारमध्ये बसण्यासाठी मुलींना बोलवतो आहे. ही घटना मानखुर्द उड्डाण पुलावरची आहे. मंगळवारी संध्याकाळी ७.३० ची ही घटना आहे. ज्या मुलीला हा मुलगा कारमध्ये बसण्यासाठी बोलवत होता त्याच मुलीने हा व्हिडिओ शूट केला आहे. अशा प्रकारे स्टंट करणं हे या मुलाच्या जीवावार बेतू शकतं. मुंबई पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज मागावं आणि या तरूणावर कठोर कारवाई करावी असंही राज माजी यांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी काय उत्तर दिलं आहे?

मुंबई पोलिसांनाही राज माजी यांनी टॅग केलं होतं. हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर राज माजी यांना काही वेळातच मुंबई पोलिसांनीही उत्तर दिलं. आम्ही तुमची विनंती मानखुर्दच्या वाहतूक विभागाकडे पाठवली आहे. ते काही वेळातच आवश्यक ती कारवाई करतील असं उत्तर मुंबई पोलिसांनी दिलं आहे.

मुंबईतल्या मानखुर्द भागात घडलेला हा स्टंटचा प्रकार त्या तरूणाच्या जीवावारही बेतला असता. कारण धावत्या कारमधून अर्धवट बाहेर येत तो मुलीची छेड काढतो आहे आणि तिला कारमध्ये बसायला बोलावतो आहे असं व्हिडिओत दिसतंय. या सगळ्यात जर तो खाली पडला असता तर त्याचा अपघात झाला असता. या अपघातात त्याचा जीव जाण्याची किंवा तो कायमचा जायबंदी होण्याचीही शक्यता होती. आता घडल्या प्रकारानंतर मानखुर्द वाहतूक पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं का? या तरूणाला अटक केली का? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळणं बाकी आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 20:52 IST

संबंधित बातम्या