Mumbai Pune Nagpur news: राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात पावसाने उघडीप दिली आहे. ठराविक भाग वगळता अजूनही इतर भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे परिसराला आज दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.

आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात जात असतात. भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागाच्या ८ आगारांमधून १७५ विशेष बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या संबंधित बातम्यांसह मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 23 June 2025

22:34 (IST) 23 Jun 2025

सरसकट कर्जमाफीसाठी ‘रासप’चे आंदोलन

हवामानातील लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...अधिक वाचा
22:18 (IST) 23 Jun 2025

आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या मदतीला ‘कुशल’, प्रवेश प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी दूर करणार

आयटीआयच्या प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून ‘कुशल’ ही चॅटबॉट सुविधा सुरू करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
21:51 (IST) 23 Jun 2025

शहरबात, कायदा-सुव्यवस्थेची : मोहजालापासून सावधान!

बिबवेवाडी भागात एका ज्येष्ठ नागरिकाची विवाहविषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून १३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ...वाचा सविस्तर
21:37 (IST) 23 Jun 2025

माथाडी कायद्यात बदल केल्यास संघर्ष अटळ - डाॅ. बाबा आढाव यांचा इशारा

माथाडी कायद्यात बदलाचा प्रयत्न केल्यास रस्यावर उतरून संघर्ष करू,’ असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डाॅ. बाबा आढाव यांनी दिला. ...सविस्तर वाचा
20:37 (IST) 23 Jun 2025

माळेगाव कारखान्याचा उद्या फैसला, अजित पवार उभे असलेल्या गटाचा निकाल सर्वप्रथम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उभे असलेल्या ‘ब’ गटाची मतमोजणी सुरुवातीला होणार असल्याने हा निकाल सर्वप्रथम हाती येईल. ...अधिक वाचा
19:11 (IST) 23 Jun 2025

ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मामुर्डी येथे घडली, नवीन बालाजी इडगुलू ( वय ३५, रा. शितळानगर, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ...वाचा सविस्तर
18:34 (IST) 23 Jun 2025

पालघरमधील आदिवासी शेतकरी पुत्राला ‘नीट’मध्ये ४१७ गुण, कृष्णा गिंभलची यशस्वी भरारी

पुण्यात राहून कृष्णाने ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ या उपक्रमाअंतर्गत रात्रंदिवस मेहनत घेत तयारी केली आणि आता २०२५ च्या नीटमध्ये यशस्वी झाला असून त्याला एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे जवळपास निश्चित आहे. ...सविस्तर वाचा
18:14 (IST) 23 Jun 2025

पालघर : राष्ट्रीय महामार्गा पाठोपाठ अंतर्गत मार्गांवर वाहतूक कोंडी, बहाडोली दहिसर मार्गांवर दोन-तीन किलोमीटरच्या रांगा

सातिवली उड्डाणपुलाच्या अपूर्णतेमुळे तसेच सेवा रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने गेल्या बुधवारपासून या मार्गावर कोंडी होत आहे. ...सविस्तर वाचा
18:10 (IST) 23 Jun 2025

डोंबिवलीत दोन लाखाहून अधिक सीडबॉलची निर्मिती; दोन हजाराहून पर्यावरणप्रेमींसह विद्यार्थ्यांचा सहभाग

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टच्या वतीने वड, पिंपळ यांसारख्या विविध झाडांच्या बिया वापरून मातीचे गोळे करण्यात आले. ...सविस्तर बातमी
18:10 (IST) 23 Jun 2025

कडोंमपा हद्दीत बेशिस्तीने भूमिगत सेवा वाहिन्या टाकणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई; शहर अभियंता अनिता परदेशी यांचा इशारा

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत विविध शासकीय, निमशासकीय संस्थांकडून भूमिगत सेवा वाहिन्या टाकण्याची कामे केली जात आहेत. ...वाचा सविस्तर
18:10 (IST) 23 Jun 2025

गाव-पाड्यातील परिसर स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवावा; मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ७७७ गावांमध्ये केंद्र शासनामार्फत पाहणी होणार आहे. ...अधिक वाचा
17:58 (IST) 23 Jun 2025

एमपीएससीचा ऐतिहासिक निर्णय: भरती प्रक्रियेकरिता पर्सेंटाईल पद्धती लागू

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा पोलीस उपनिरीक्षक अशा विविध परीक्षांसह सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जाते. ...सविस्तर वाचा
17:57 (IST) 23 Jun 2025

पालखी सोहळ्यावेळी ‘एआय’च्या साह्याने गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियोजन!

पुणे पोलिसांकडून प्रथमच प्रयोग; शहरात चार लाख ९० हजार भाविक सहभागी झाल्याची माहिती तंत्रज्ञानाद्वारे केलेल्या मोजणीत संकलित ...सविस्तर बातमी
17:09 (IST) 23 Jun 2025

बुलढाणा: मेरा खुर्दमध्ये युवकाची भर चौकात निर्घृण हत्या ! कोयत्याने वार

प्राथमिक माहितीनुसार खून झालेल्या तरुणाचे अंदाजे वय २५ वर्षे असून त्याची ओळख अजून पटली नाही. ...अधिक वाचा
17:01 (IST) 23 Jun 2025

पिंपरी महापालिकेत आयटी पार्क समाविष्ट करा, आयटीयन्सची मागणी; हिंजवडी परिसरातील नागरी समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ

हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होणे यांसह अनेक समस्या आहेत. ...सविस्तर बातमी
16:28 (IST) 23 Jun 2025

जळगाव शहरातील कचरा उचलण्यास अखेर सुरूवात… ‘लोकसत्ता’ वृत्तामुळे प्रशासनास जाग

वेतन थकल्याचे कारण देत वॉटरग्रेससाठी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी १७ तारखेपासून काम बंद आंदोलन सुरु केले. ...सविस्तर वाचा
16:21 (IST) 23 Jun 2025

दादा भुसेंच्या उपस्थितीतील प्रवेशोत्सव ठरला वादग्रस्त! स्वागतापूर्वी विद्यार्थ्यांकडून सफाईची कामे, मंत्री म्हणाले, "कारवाई करू…"

उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर विदर्भातील शाळा सोमवारी, २३ जून रोजी सुरु झाल्या. या निमित्त जिल्ह्या भरातील शासकीय व खाजगी शाळात प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ...सविस्तर वाचा
16:15 (IST) 23 Jun 2025

पुलांचे उड्डाण होणार कधी? कल्याण ते बदलापूर अपुऱ्या, अरुंद उड्डाणपुलांमुळे कोंडी वाढली

अपुरे रस्ते प्रकल्प, वाहनांची वाढलेली संख्या आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे सध्या संपूर्ण ठाणे जिल्हा कोंडीत अडकला आहे. त्यातच नियोजनशून्य कारभार, अपुऱ्या आणि अरूंद उड्डाणपुलांमुळे सध्या कल्याण ते बदलापुरपर्यंत सर्वच शहरांमध्ये शहरांतर्गत वाहतूकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. ...वाचा सविस्तर
15:55 (IST) 23 Jun 2025

संघाचे ठरले… तारीखही निघाली… स्वतः सरसंघचालक दिल्लीच्या ‘केशवकुंज’ मध्ये…

भारतीय जनता पक्षाची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. ...सविस्तर बातमी
15:16 (IST) 23 Jun 2025

ग्रामपंचायत मालमत्तांची माहिती मिळणार ऑनलाईन!

जिल्हा परिषदेच्या ‘डिजिटल ग्रामशासन’ उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या स्थावर आणि जंगम मालमत्तांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
15:10 (IST) 23 Jun 2025

वाहतूक कोंडीला रो-रो चा आधार; विरार कडे जाणाऱ्या नागरिकांचे रोरो ला प्राधान्य

राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या तुफान वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून अनेक प्रवाशांनी आता सफाळे ते विरार दरम्यानच्या रो-रो सेवेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ...वाचा सविस्तर
15:10 (IST) 23 Jun 2025

बुलेट ट्रेन मार्गाचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसविला; महाराष्ट्रात पहिल्यांदाच बसविला पूर्ण लांबीचा बॉक्स गर्डर

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या महाराष्ट्र विभागातील डहाणू तालुक्यातील साखरे गावात ४० मीटर लांबीचा बॉक्स गर्डर यशस्वीरित्या बसवला आहे. ...सविस्तर वाचा
14:58 (IST) 23 Jun 2025

पुणे : नदीपात्रात अडकलेल्या महाविद्यालयीन युवकाला जीवदान, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे युवक बचावला

नदीपात्रात अडकलेल्या महाविद्यालयीन युवकाला अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. ...सविस्तर वाचा
14:28 (IST) 23 Jun 2025

नाशिकच्या महिला डाॅक्टरची कर्ज देतो सांगून डोंबिवलीतील सावकाराकडून फसवणूक

नाशिक येथील एका महिला डाॅक्टरला व्यवसायासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवून डोंबिवलीतील एका खासगी सावकाराने कर्ज प्रक्रियांसाठी १२ लाख रुपये डाॅक्टर महिलेकडून उकळले. ...वाचा सविस्तर
14:16 (IST) 23 Jun 2025

सरकारी शाळांत किलबिलाट, खासगी शाळांत शुकशुकाट…

विदर्भात आज सोमवारी शाळांची घंटी वाजली. आजपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या. ...सविस्तर बातमी
14:00 (IST) 23 Jun 2025

वर्सोवा पुलावरून ऑइल वाहतूक टँकर खाडीत कोसळला; एकाचा मृत्यू, तर शोध मोहीम सुरु

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावरून ऑइल वाहतूक करणारा टँकर कठडा तोडून खाडीत कोसळल्याची घटना घडली आहे. ...सविस्तर बातमी
13:55 (IST) 23 Jun 2025

जळगावहून मुंबईला फक्त पाच तासांत पोहोचता येणार … समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली

जळगाव ते छत्रपती संभाजीनगर तसेच चाळीसगाव ते कन्नड दरम्यानच्या वाहतुकीला अधिक गतीमान व सुलभ करण्याच्या दृष्टीने नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक रविवारी झाली. ...वाचा सविस्तर
13:47 (IST) 23 Jun 2025

आयआयटीचा विद्यार्थी, अपघाताने शेतीत आणि भरघोस उत्पन्न; आता म्हणतो…

बंगळूरू येथून बी. ई. केल्यानंतर जॉब सूरू झाला. तितक्यातच दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले. तेव्हा वर्क फ्रॉम होम मिळाल्याने घरीच. ...सविस्तर वाचा
13:39 (IST) 23 Jun 2025

नितीन गडकरी पुन्हा स्पष्टच बोलले, "माझ्या मुलांसाठी तिकीट मागत नसल्याने पक्षातील अनेकांची अडचण…"

अनेकदा त्यांनी स्वपक्षालाही धडा दिलेला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या अशाच एका कार्यक्रमात त्यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले. ...सविस्तर वाचा
13:32 (IST) 23 Jun 2025

पिंपरीत भाजप, अजित पवार गटातील वाद विकोपाला

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेत असलेल्या आणि पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिस्पर्धी असलेल्या महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात विकास कामांच्या श्रेयवादावरुन वाद सुरू झाला आहे. ...अधिक वाचा

मुंबई, नागपूर, पुणे जिल्ह्यातील बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर...