मालाड येथे पुलाचा काही भाग कोसळून तीन वाहनचालक जखमी

एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम) येथे हा पूल असून त्यावरून दुचाकी वाहनांची जा-ये सुरू असते.

मालाड (पश्चिम) येथील लगून मार्गावर असणाऱ्या पुलाचा काही भाग रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास कोसळला. यात तीन वाहनचालक जखमी झाल्याचे बृहन्मुंबई महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.
एव्हरशाईन नगर, मालाड (पश्चिम) येथे हा पूल असून त्यावरून दुचाकी वाहनांची जा-ये सुरू असते. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन वाहन चालकांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले तर एकावर उपचार सुरू असल्याची माहितीही देण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bridge collapse at malad

ताज्या बातम्या