मुंबई : पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मृतदेह दहनासाठी यापुढे लाकडांऐवजी शेती व वृक्षकचऱ्यापासून तयार केलेल्या जैविक विटा (ब्रिकेटस बायोमास) वापरण्यात येणार आहेत. पालिकेने २०१७ मध्ये या प्रयोगाची घोषणा केली होती. मात्र आता या जैविक विटांसाठी पालिका निविदा प्रक्रिया राबवणार असून मुंबईतील १४ स्मशानभूमींमध्ये या विटाचा वापर करण्यात येणार आहे.

पालिकेने २०१७ मध्ये मृतदेहांच्या दहनासाठी जैविक विटा वापरण्याचा प्रयोग केला  होता. तीन स्मशानभूमीत प्रायोगिक तत्त्वावर या जैविक विटा वापरल्या जाणार होत्या. पालिकेने आता पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी १४ स्मशानभूमींमध्ये अशा विटा वापरण्याचे ठरवले आहे. पालिकेच्या स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी व गॅस दाहिनी उभारण्यात आल्या आहेत. मात्र तरीही आजही अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दहन करण्याची मागणी असते. अशा ठिकाणी पालिकेतर्फे लाकडाचा मोफत पुरवठा केला जातो.

Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
summer
सुसह्य उन्हाळा!
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण

लाकडासाठी मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च करावा लागतो आणि त्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होतो. त्यामुळे शेती कचरा व वृक्ष कचऱ्यापासून तयार केलेल्या ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर हा तुलनेने अधिक पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे १४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. त्याकरिता लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

एका मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड

पारंपरिक स्मशानभूमीमध्ये प्रत्येक मृतदेहासाठी ३०० किलो लाकूड पालिकेतर्फे मोफत पुरविण्यात येते. हे ३०० किलो लाकूड साधारणपणे २ झाडांपासून मिळते. जैविक विटांचा पुरवठा करण्यात येणाऱ्या १४ स्मशानभूमींमध्ये दरवर्षी साधारण ६२०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. वर्षभरात तेथे मृतदेहाच्या दहनासाठी साधारणपणे १८ लाख ६० हजार किलो लाकडांचा वापर करण्यात येतो.

जैविक विटांविषयी..

शेती कचऱ्यांतील ‘एक तृतीयांश’ भाग फेकून देण्यात येतो. त्यापासून ‘ब्रिकेट्स बायोमास’ तयार करण्यात येतात. ज्यामुळे सदर कचऱ्याचा अधिक चांगला उपयोग करण्याबरोबरच पर्यावरणपुरकता देखील जपली जाते. लाकडांपेक्षा ‘ब्रिकेट्स बायोमास’मुळे प्राप्त होणारी ‘ज्वलन उष्णता’ अधिक असल्याने प्रत्येक मृतदेहासाठी २५० किलो ‘ब्रिकेट्स बायोमास’ पुरेसे असते.

निवड करण्यात आलेल्या १४ स्मशानभूमी

मलबार हिल येथील मंगलवाडी (बाणगंगा) स्मशानभूमी, भायखळय़ातील वैकुंठधाम हिंदू स्मशानभूमी,  गोयारी हिंदू स्मशानभूमी, धारावी हिंदू स्मशानभूमी, खारदांडा हिंदू स्मशानभूमी, वर्सोवा हिंदू स्मशानभूमी, मढ हिंदू स्मशानभूमी, कांदिवलीतील ‘वडारपाडा हिंदू स्मशानभूमी, दहिसर हिंदू स्मशानभूमी, चुनाभट्टी हिंदू स्मशानभूमी, चिताकॅम्प हिंदू स्मशानभूमी, आणिक गाव हिंदू स्मशानभूमी, भांडुप गुजराती सेवामंडळ स्मशानभूमी आणि मुलुंड नागरिक सभा हिंदू स्मशानभूमी अशा १४ स्मशानभूमींमध्ये ‘ब्रिकेट्स बायोमास’चा वापर करण्यात येणार आहे.