दादरमध्ये ब्रिटिश जोडप्याला मारहाण

मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या एका ब्रिटिश पर्यटक जोडप्यातील तरुणीला धक्काबुक्की करत तिच्या मित्राला मारहाण केल्याची घडना दादर येथे घडली़

मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या एका ब्रिटिश पर्यटक जोडप्यातील तरुणीला धक्काबुक्की करत तिच्या मित्राला मारहाण केल्याची घडना दादर येथे घडली़ त्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीचा पाठलाग करत वाहतूक पोलिसांनी त्यास अटक केली. प्लाझा सिनेमागृहाजवळ शनिवारी दुपारी ही घटना घडली.
ब्रिटनचे जेम्स हेनन आणि इंडियाना हेनन हे पर्यटक जोडपे मुंबईत आले आहे. शनिवारी दुपारी ते दादर येथे दिवाळीनिमित्त सुरू असलेल्या खरेदीचे छायाचित्रे काढत होते. त्या वेळी राजू कलाल (३०) या आरोपीने त्याला हरकत घेत इंडियानाला धक्काबुक्की आणि शिविगाळ केली. तिच्या मदतीसाठी आलेल्या जेम्सलाही त्याने मारहाण केली. या प्रकारानंतर राजू घटनास्थळावरून पळून गेला. बिनतारी यंत्रणेवर संदेश मिळताच वाहतूक पोलिसांनी राजूला नागरिकांच्या मदतीने पकडले. तो याच परिसरातील रस्त्यावर राहात असून अंमली पदार्थाचे सेवन करणारा आहे. त्याच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून त्याला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. फोटो काढल्याचा राग आल्याने या जोडप्याला मारहाण केल्याचे राजूने पोलिसांनी सांगितले.   

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: British coupal beaten up in dadar