मुंबई विद्यापीठाची अर्थसंकल्पीय बैठक येत्या सोमवारी (२० मार्च रोजी) आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत मुंबई विद्यापीठाचा २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीस १० नामनिर्देशित अधिसभा सदस्य आणि प्रभारी कुलगुरू, प्र-कुलगुरू, कुलसचिव आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मात्र अधिसभा सदस्यांची निवडणूक अद्याप होऊ न शकल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच अर्थसंकल्पीय बैठक होणार आहे.

हेही वाचा >>>मुंबई: शिंदे गटाला केवळ ४८ जागा?

CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा

मुंबई विद्यापीठातील १० निर्वाचित अधिसभा सदस्यांची मुदत सहा महिन्यांपूर्वीच संपुष्टात आली असून दीड महिन्यापूर्वी यासाठीची मतदार नोंदणी पूर्ण झाली. मात्र अद्याप निवडणूक झालेली नाही. त्यामुळे अर्थसंकल्पीय बैठक निर्वाचित अधिसभा सदस्यांविनाच होणार आहे. यामुळे, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकारण होणार कसे? आणि आवश्यक त्या उपाययोजनांचा समावेश अर्थसंकल्पात कसा करणार? असे प्रश्न आता विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई विद्यापीठातील कुलगुरू, प्र. कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक, विद्यार्थी कल्याण विभाग – संचालक ही पदे प्रभारी स्वरूपात आहेत, अद्यापही या पदांसाठी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आलेली नाही.

हेही वाचा >>>मुंबई: राज्यात ‘एच ३ एन २’चे ४७ चे नवे रुग्ण

विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे आणि त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी प्रभारी प्र. कुलगुरु डॉ.अजय भामरे यांना दिले आहे. या मागण्यांवर सभागृहात चर्चा करून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि याबाबत विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझ येथील कलिना संकुलातील मुलींच्या नवीन वसतीगृहात महानगरपालिकेतर्फे नळजोडणी, नवीन वाचनालय इमारत, तसेच कोट्यवधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेला जलतरण तलाव विद्यार्थ्यांसाठी कधी खुला करणार?, अधिसभा सदस्यांची निवडणूक कधी होणार आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.