मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले आणि सहआरोपी रणजित मोहिते यांना बुधवारी विशेष न्यायालयाने आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणात जामीन मंजूर केला. न्यायालयाने त्यांच्याविरोधातील दोषारोपपत्राची दखल घेतली.  

मूळ गुन्ह्यात आरोपी दोषमुक्त किंवा निर्दोष सुटले असतील, तर त्या गुन्ह्याच्याआधारे दाखल करण्यात आलेला आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा टिकणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जुलै महिन्यात दिला होता. त्याचाच आधार घेऊन अमित भोसले आणि मोहिते या दोघांनी विशेष न्यायालयाकडे जामिनाची मागणी केली होती.

mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Abhishek Ghosalkar murder case
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीकडे द्या, तेजस्वी घोसाळकरांची उच्च न्यायालयात मागणी
navneet rana and congress candidate rashmi barve
एकाच मुद्यावरील न्यायालयाच्या निर्णयाने एक निवडणूक रिंगणात तर दुसरी रिंगणाबाहेर
Hearing on petitions related to Maratha reservation now before the full bench of the High Court
मराठा आरक्षणाशी संबंधित याचिकांवर आता उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी

हेही वाचा >>> अमरावती : शिक्षकाने एका शिक्षिकेला रात्री मोबाइलवर कॉल केला व म्हणाला…

त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना, या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याने आणि त्यांच्याविरोधातील आरोपपत्राची दखल घेतली गेल्याने त्यांना औपचारिकरीत्या ताब्यात घेण्यात येत आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधारे त्यांची प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या जामिनावर सुटका केली जात असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

कारण काय? मूळ गुन्हा रद्द झाला असेल तर आर्थिक गैरव्यवराहाचा गुन्हा कायम राहू शकत नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे न्यायालयाने तात्पुरते ताब्यात घेऊन नंतर जामीन मंजूर केला.