आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना इतरांना मदत केल्यामुळे समाधान मिळतं. मग ती मदत कोणत्याही स्वरूपाची असो. अशीच एक गोष्ट आहे मुंबईच्या बुलबुल राय यांची. परेल येथील टाटा हॉस्पिटलमध्ये देशभरातून लोक कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी येत असतात. परराज्यातून आलेल्या या रुग्णांची मुंबईत राहण्याची आणि खाण्या-पिण्याची मोठी गैरसोय होते. लोकांची ही गैरसोय बुलबुल राय यांना बघवली नाही आणि त्यांनी स्वतः अशा लोकांना मदत करायचं ठरवलं. गेली १४ वर्ष बुलबुल या कॅन्सरग्रस्तांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत करत आहेत. ‘बुलबुल रॉय फाउंडेशन’द्वारे त्या कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय करतात. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया बुलबुल रॉय यांच्या या असामान्य कार्याबद्दल…

टाटा हॉस्पिटलजवळून जाताना रस्त्यावर कॅन्सरग्रस्त आणि त्यांच्या नातेवाईकांची होणारी गैरसोय पाहून अनेकदा आपलंही मन हळहळलं असे. पण बुलबुल राय मात्र या सर्व विचारांच्या पलीकडे जाऊन गेली १४ वर्ष या लोकांना आसरा मिळावा म्हणून अथक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरल्या आहेत. ‘गोष्ट असामान्यांची’ या मालिकेचे इतर भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.