मुंबई : ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात आला असून  ब्लॉक कालावधीत मध्य रेल्वेच्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच जम्बो ब्लॉकच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावणार आहेत. दरम्यान, हार्बर मार्गावरी लोकलही शुक्रवारी विलंबाने धावत होती. त्यामुळे वेळेवर कार्यालयात पोहोचण्यासाठी शुक्रवारी सकाळी अनेकांनी एनएमएमटी, तसेच राज्य परिवहन महामंडळच्या (एसटी) बसचा पर्याय निवडला. यामुळे सकाळपासूननच बसमध्ये प्रचंड गर्दी दिसत होती.

फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामांसाठी सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेतला आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते रविवार दुपारी १२.३० पर्यंत हा ब्लॉक असून या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते दादर आणि सीएसएमटी ते वडाळा लोकल बंद असतील.मात्र, रेल्वे उशीराने धावतील तसेच मेगाब्लॉकनुसार वेळापत्रक चालवले तर  अनेक गाड्या रद्द होतील आणि कार्यालयात पोहोचायला उशीर होईल या गैरसमजातून हार्बर मार्गावरील अनेक प्रवाशांनी  शुक्रवारी बसने प्रवास करणे पसंत केले. एनएमएमटीची पनवेल – दादर बस सेवा, तर राज्य परिवहन महामंडळाची पनवेल / उरण – दादर अशी बससेवा उपलब्ध आहे. दरम्यान, नेहमीच्या रेल्वे वेळापत्रकानुसार लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शुक्रवारी कार्यालयात पोहोचण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

Mumbai Weekend Railway Block, Railway Blocks on Western and Central Lines, Railway Block on Western Line, Railway Block on Central Line, Railway Block on harbour Line, Maintenance Work,
शनिवारी पश्चिम आणि रविवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक
Mumbai, Inspection, new buildings,
मुंबई : नव्या इमारतींची आयआयटीकडून तपासणी, ताबा घेतलेल्या म्हाडाच्या २०७ पैकी ९६ घरांमध्ये बदल
thane township residents unite to close rmc project in ghodbunder area
घोडबंदरचा ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्यासाठी रहिवाशांची एकजूट; आंदोलनात पर्यावरणवादी सहभागी
Megablack Sunday on Central Railway Mumbai print news
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक
Pune, Central Railway, New Rooftop Solar Plant on Diesel Loco Shed Ghorpadi, Rooftop Solar Plant, Save Rs 52 Lakh Annually, solar plant, central railway, pune, pune news,
रेल्वे वाचविणार वर्षाला ५२ लाख रुपये! विजेच्या खर्चात बचत करण्यासाठी ‘अपारंपरिक’ पर्याय
separate road will be built for the construction of the vadhavan port
‘वाढवण’साठी स्वतंत्र पायाभूत सुविधा; पालघर जिल्ह्याचा आर्थिक स्तर तिपटीने वाढण्याचा दावा
water tunnel Wadala Paral
वडाळा – परळदरम्यानच्या जलबोगद्याचे खणन पूर्ण, प्रकल्प पूर्ण होण्यास एप्रिल २०२६ ची मुदत
Hero Splendor Bike
होंडा, बजाज फक्त पाहतच राहिल्या! ७४ हजाराच्या ‘या’ बाईकला खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा, ३० दिवसात ३ लाखांहून अधिक विक्री 

दरम्यान, गुरुवारी देखील सीएसएमटीकडून पनवेल,वाशीला जाणाऱ्या गाड्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना एक तासाऐवजी दीड तास प्रवास करावा लागला.