मुंबईतील शिक्षकांसाठी बससेवा

दरम्यान, दहावीच्या निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई  : दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यांत आल्यानंतर आता शिक्षण विभागाने मुंबईतील शिक्षकांसाठी वाहतुकीची सोय केली आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातून मुंबईत येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस सोमवारपासून सोडण्यात येणार आहेत.

दहावीच्या मूल्यमापनाचा आराखडा, वेळापत्रक जाहीर झाल्यापासून वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षक सातत्याने करत होते. शाळेपर्यंत पोहोचताच आले नाही, तर निकाल कसा जाहीर करायचा असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला होता. जवळपास महिनाभर सुरू असलेल्या या वादावर निकालाचे काम अंतिम टप्प्यांत पोहोचल्यावर शिक्षण विभागाने तोडगा काढला आहे. रेल्वे प्रवासाला पर्याय म्हणून शिक्षकांसाठी एसटीच्या बस सोडण्यात येणार आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली, विरार, वसई, नालासोपारा, पनवेल येथून दादर, कुर्ला, भायखळा, अंधेरी, मुंबई सेंट्रल येथे जाण्यासाठी बस सोडण्यात येतील. सकाळी आणि सायंकाळी या विशेष बस सुटतील.

दरम्यान, दहावीच्या निकालाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई विभागातील निकालाचे काम ९० टक्क््यांपेक्षा अधिक झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने भुर्दंड सहन करून, रेल्वे स्थानकावरील अडवणूकीला तोंड देत, दंड भरून शिक्षकांनी शाळा गाठल्या आणि निकालाचे काम पुढे नेले. त्यामुळे आता बससेवा उपलब्ध करून दिली असली तरी झालेला मनस्ताप आणि खर्च विभाग कसा भरून देणार असा प्रश्न शिक्षकांनी विचारला आहे. त्याचप्रमाणे मुंबई विभागीय उपसंचालकांचे पत्र हे दहावीच्या मूल्यांकनाचे काम करणाऱ्या  शिक्षकांपुरतेच आहे. आता बारावीच्या मूल्यांकनाचेही काम सुरू होणार आहे, त्याबाबत या पत्रांमध्ये उल्लेख नाही, असा आक्षेपही शिक्षकांनी घेतला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bus service for teachers in mumbai akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या