scorecardresearch

मुंबई : व्यापाऱ्याची आरे कॉलनी परिसरात आत्महत्या

मनोजकुमारने आरे कॉलनीतील एका झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई : व्यापाऱ्याची आरे कॉलनी परिसरात आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

व्यवसायात झालेले नुकसान आणि वाढलेला कर्जाचा बोजा यामुळे मानसिक नैराश्यातून मनोजकुमार प्रजापती (४५) या व्यापाऱ्याने आत्महत्या केली. मनोजकुमारने आरे कॉलनीतील एका झाडाला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपमृत्युची नोंद करून त्याच्या पत्नीसह भावाचा जबाब नोंदवला.

हेही वाचा >>> आमदार प्रसाद लाड यांच्या आईबद्दल बदनामीकारक पोस्ट; मुंबईत दोन ठिकाणी गुन्हे दाखल

या आत्महत्येबाबत कोणीही संशय व्यक्त केला नाही. मनोजकुमार हा मालाडमधील कुरार व्हिलेज परिसरात पत्नी आणि तीन मुलांसोबत राहत होता. त्याला तीन भाऊ असून त्यांचा भांड्याचा व्यवसाय आहे. लहान भावाने मनोजकुमारला त्याच्या व्यवसायासाठी मदत केली होती. मात्र मनोजकुमारचे व्यवसायात लक्ष नव्हते. त्यातच त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले होते. अनेकदा तो मद्यप्राशन करून दुकानात येत होता. या वर्तणुकीला कंटाळून त्याचा भाऊ त्याच्यापासून वेगळा झाला होता. त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे मनोजकुमारला व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. तो कर्जबाजारी झाला होता.

हेही वाचा >>> दाभोलकर हत्या प्रकरण: खटला सुरू झाल्याने उच्च न्यायालयाच्या देखरेखीची गरज नाही

सोमवारी त्याने त्याच्या पत्नीकडे व्यवसायासाठी दहा हजार रुपये मागितले, तिच्याकडे दहा हजार रुपये नव्हते. तिच्याकडील पाच हजार रुपये घेऊन तो घरातून निघून गेला. रात्री उशिरापर्यंत त्याने मद्यप्राशन केले. त्यानंतर तो आरे कॉलनीतील संक्रमण शिबीर, आरे चेकनाका परिसरात आला. तिथेच त्याने एका झाडाला नायलॉयनच्या दोरीने गळफास लाऊन आत्महत्या केली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 16:07 IST

संबंधित बातम्या