एलफिन्स्टन रोड येथे व्यापाऱ्याची हत्या

एलफिन्स्टन रोड येथे एका कापड व्यापाऱ्याची त्याच्याच गोदामात कात्रीचे वार करुन हत्या करण्यात आली. दिपक कदम (४५) असे या व्यापाऱ्याचे नाव असून बुधवारी मध्यरात्री त्यांचा मृदहेद गोदामात आढळून आला. कदम यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.दिपक कदम यांचे एलफिन्स्टन रोड, येतली फितवाला मार्गावर ‘सद्गुरू अपार्टमेंट’ मध्ये कपडयाचे दुकान आहे.

एलफिन्स्टन रोड येथे एका कापड व्यापाऱ्याची त्याच्याच गोदामात कात्रीचे वार करुन हत्या करण्यात आली. दिपक कदम (४५) असे या व्यापाऱ्याचे नाव असून बुधवारी मध्यरात्री त्यांचा मृदहेद गोदामात आढळून आला. कदम यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.दिपक कदम यांचे एलफिन्स्टन रोड, येतली फितवाला मार्गावर ‘सद्गुरू अपार्टमेंट’ मध्ये कपडयाचे दुकान आहे. याच परिसरातील ‘सिद्धी सदन’ इमारतीत ते राहतात. मंगळवारी संध्याकाळी ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरु केला.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास कुटुंबीयांनी तिसऱ्या मजल्यावर गोदामात जाऊन शोध घेतला तेव्हा गोदामाचे दार बंद आढळले. पोलिसांच्या मदतीने गोदाम उघडले असता कदम कदम यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. जवळच हत्येसाठी वापरण्यात आलेली कात्रीहीसापडली. कदम यांच्या गळ्यावर, छातीवर मिळून एकूण १२ वार करण्यात आले होते. कदम यांनी मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता आपल्या भ्रमणध्वनीवरून शेवटचा कॉल केला होता. संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान त्यांची हत्या झाली असावी अशी शक्यता ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर घागरे यांनी व्यक्त केली.
कदम यांच्या गोदामातील रोख रक्कम आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने मृतदेहावरच आढळल्याने या हत्येमागे चोरीचा उद्देश नसावा असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोर हा कदम यांच्या ओळखीचा असावा तसेच त्याने सोबत हत्यार आणले नसल्याचेही स्पष्ट झाले. वैयक्तिक कारणांवरून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Businessman killed at elphinstone road