शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा विरोधात फसवणुकीचा गुन्हा

पुण्यातील नितीन जयंतीलाल बराई यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

मुंबई : वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा व काशिफ खान यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील नितीन जयंतीलाल बराई यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. दरमान, शिल्पा शेट्टीने या प्रकरणात आपले नाव गोवण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली. तक्रारीनुसार, २०१४ मध्ये एसएफएल फिटनेस प्रा. लि. डायरेक्टर काशिफ खानने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सोबत मिळून नितीन बराईला एक कोटी रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. या रकमेचा त्यांनी अपहार केला. तसेच रकमेची मागणी केली असता त्यांना धमकी देण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Businessman lodges cheating case against shilpa shetty raj kundra zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या