बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कुंद्राला अटक केली. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल अॅप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचं प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणलं होतं. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी कारवाई केली होती. पॉर्न अॅप्स प्रकरणी त्यावेळी गुन्हाही दाखल झाला होता. या प्रकरणात राज कुंद्रा मुख्य सूत्रधार असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात त्याच्याविरुद्ध पोलिसांकडे पुरेसे पुरावे असल्याची माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलनं कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं.

या प्रकरणात पोलिसांकडून चित्रपट बनवणाऱ्या अनेकांची चौकशी करण्यात आली होती. आज (१९ जुलै) कुंद्राला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सुमारे ७ ते ८ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी राज कुंद्राला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कुंद्राला उद्या (२० जुलै) न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. राज कुंद्राविरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman raj kundra raj kundra arrested in porn apps case key conspirator in the porn apps case bmh
First published on: 19-07-2021 at 23:19 IST