scorecardresearch

Premium

अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटीची फसवणूक; भागीदाराला अटक

अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी संजय सहा या व्यावसायिकाला अटक केली.

Vivek Oberoi, Businessman Sanjay Saha arrested on charges of defrauding actor Vivek Oberoi
अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटीची फसवणूक; भागीदाराला अटक

मुंबई : अभिनेता विवेक ओबेरॉयची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांनी संजय सहा या व्यावसायिकाला अटक केली. आरोपी विवेक ओबेरॉयचा व्यावसायिक भागीदार आहे.

या प्रकरणी निर्माता संजय सहा यांच्यासह नंदिता साहा, राधिका नंदा व इतर आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. ओबेरॉय मेगा एंटरटेन्मेंटचे सनदी लेखापाल देवेन जवाहरलाल बाफना (५७) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जुलै महिन्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २४ फेब्रुवारी २०१७ रोजी ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांका यांनी ऑरगॅनिक एलएलपीची स्थापना केली होती. ऑरगॅनिक क्षेत्रात जास्त मागणी न मिळाल्याने त्यांनी चित्रपट क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. त्याचदरम्यान विवेक यांची संजय सहा यांच्याशी ओळख झाली.

school girl molested by police
रक्षक झाला भक्षक…, पोलीस कर्मचाऱ्याकडून शाळकरी मुलीशी अश्लील वर्तन
arrest Delhi Police arrested three people
कुख्यात दहशतवाद्यासह तिघांना दिल्ली पोलिसांकडून अटक; ‘एनआयए’ला हवा असलेला शाहनवाझ जाळ्यात 
ed rain in mumbai and across the country, ed rain in mumbai, ed raid at 39 locations in the country, ed seized property of 417 crores
ईडीचे मुंबईसह देशभरात ३९ ठिकाणी छापे; ४१७ कोटींची मालमत्ता जप्त, सेलिब्रिटींनीही हवालामार्फत पैसे स्वीकारले
mumbai murder, 36 year old man stabbed to death at saki naka, bear bottle hit on the head in mumbai
मुंबई : साकिनाका येथे ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या

हेही वाचा>>>राज्यातही ओबीसी जनगणना करा; भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची मागणी -सरकार सकारात्मक, फडणवीस यांची ग्वाही

सहा यांना चित्रपट निर्मितीचा अनुभव असल्याने एकत्रित काम करण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे संजय सहा यांच्यासह नंदिता सहा, राधिका नंदा यांनाही त्यांच्या कंपनीत भागीदार केले.पुढे त्यांनी आनंदिता एन्टरटेनमेंट एलएलपी या कंपनीची स्थापना केली. या कंपनीत विवेक ओबेरॉय यांनी वैयक्तिक खात्यातून, तसेच ओबेराय मेगा एन्टरटेनमेंट एलएलपीमधून एकूण ९५ लाख ७२ हजार ८१४ रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी आनंदिता कंपनीच्या व्यवहारांची कुठलीही माहिती विवेकला न देता वैयक्तिक वापरासाठी रक्कम खर्च केली. त्यामुळे विवेकची एक कोटी ५५ लाख ७२ हजार ८१४ रुपयांची फसवणूक झाली, असा आरोप आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याबाबत एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. ४ फेब्रुवारी २०२० ते ३० एप्रिल २०२२ दरम्यान ही फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Businessman sanjay saha arrested on charges of defrauding actor vivek oberoi mumbai news amy

First published on: 03-10-2023 at 04:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×