भाजपचा ‘पंढरपूर प्रयोग’ देगलूरमध्ये फसला; अशोक चव्हाण यांनी गड राखला

पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये स्थानिक पातळीवर फूट पडली.

मुंबई : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बाहेरचा उमेदवार आयात करून विजय संपादन के ल्यानेच देलगूरमध्येही भाजपने बाहेरच्या उमेदवाराला आयात करीत पंढरपूरची पुनरावृत्ती करण्याचा के लेला प्रयत्न मात्र अयशस्वी ठरला. नांदेड जिल्ह्यातील वर्चस्व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कायम राखले आहे.

पंढरपूरमध्ये गेल्या मे महिन्यात झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने संपत आवघडे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली होती. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढलेल्या आवघडे यांना ५० हजारांच्या आसपास मते मिळाली होती. पोटनिवडणुकीत आवघडे यांनी राष्ट्रवादीच्या भालके  यांच्या पुत्राचा   पराभव के ला होता.  तेथे सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादीला झाला नव्हता. पंढरपूरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानेच देलगूरमध्येही भाजपने असाच प्रयोग केला.

भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिली. पंढरपूरची पुनरावृत्ती देगलूरमध्ये होणार, असा ठाम दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे करीत होते. पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये स्थानिक पातळीवर फूट पडली. माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी भाजपचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश के ला. दिवंगत आमदार अंतापूरकर यांचे पुत्र आणि साबणे यांच्यातील लढतीत अंतापूरकर यांच्या मुलाला सहानुभूतीचा लाभ झाला. भाजपने सारी ताकद पणाला लावनूही त्याचा फायदा झाला नाही.

नांदेड जिल्हा हा सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. लोकसभा निवडणुकीतील चव्हाण यांच्या पराभवामुळे भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. देगलूरमध्ये अशोक चव्हाण यांना सारी ताकद पणाला लावावी लागली. पोटनिवडणुकीपूर्वी भाजपने अशोक चव्हाण यांच्याबद्दल संशयाचे वातावरण तयार के ले. त्यांच्या जवळच्यांवर आयकराच्या धाडी पडल्या. यापुढे चव्हाण यांच्यावर कारवाई होणार, असा प्रचार भाजपने सुरू के ला. किरीट सोमय्या यांना भाजपने नांदेडला पाठविले व तेथे त्यांनी नेहमीप्रमाणे यथेच्छ आरोप

के ले. पण सोमय्या यांच्या आरोपांचा भाजपला काडीमात्र फायदा झाला नाही. नांदेडचा गड राखल्याने अशोक चव्हाण यांचे पक्षांतर्गत वजन वाढणार आहे. कारण ही जागा गमाविली असती तर पक्षांतर्गत विरोधकांना संधी मिळाली असती.

दोन विजय, आता विधानसभा अध्यक्षपदासाठी कसोटी

राज्यसभा पोटनिवडणुकीबरोबरच देगलूरची पोटनिवडणूक जिंकल्याने काँग्रेसने सुटके चा नि:श्वास सोडला आहे. या महिनाअखेर होणारी विधान परिषदेची पोटनिवडणूक आणि  डिसेंबरमध्ये होणारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचे काँग्रेसपुढे आव्हान असेल. दोन विजय, आता विधानसभा अध्यक्षपदासाठी कसोटी

राज्यसभा पोटनिवडणुकीबरोबरच देगलूरची पोटनिवडणूक जिंकल्याने काँग्रेसने सुटके चा नि:श्वास सोडला आहे. या महिनाअखेर होणारी विधान परिषदेची पोटनिवडणूक आणि  डिसेंबरमध्ये होणारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याचे काँग्रेसपुढे आव्हान असेल.

विकासाच्या मुद्द्याच्या बाजूने कौल…राज्यातील जनता महाविकास आघाडीसोबत आहे, हे देगलूर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले. सामूहिक प्रयत्नांना विजयाचे फळ आले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते व  ज्येष्ठ मंत्री अशोक चव्हाण यांनी  व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: By election in pandharpur assembly constituency construction minister ashok chavan akp

ताज्या बातम्या